मस्कावदच्या कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

जळगाव ः मस्कावद (ता. रावेर) येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. गिरीश धनराज सरोदे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मस्कावद (ता. रावेर) येथील गिरीश सरोदे यांच्यावर कर्ज झालेले होते. त्यांचे वडिलांचे आठ महिन्यापूर्वीच निधन झाले होते. गिरिशच्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज काढलेले असताना ते अद्याप थकित होते. वडिलांच्या निधनानंतर कर्ज भरणे व शेतीच्या कामासाठी लागलेले पैसे देण्याची जबाबदारी गिरीश सरोदे यांच्यावर आली होती.

जळगाव ः मस्कावद (ता. रावेर) येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. गिरीश धनराज सरोदे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मस्कावद (ता. रावेर) येथील गिरीश सरोदे यांच्यावर कर्ज झालेले होते. त्यांचे वडिलांचे आठ महिन्यापूर्वीच निधन झाले होते. गिरिशच्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज काढलेले असताना ते अद्याप थकित होते. वडिलांच्या निधनानंतर कर्ज भरणे व शेतीच्या कामासाठी लागलेले पैसे देण्याची जबाबदारी गिरीश सरोदे यांच्यावर आली होती. कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून गिरीशने कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीशच्या पश्‍चात आई, एक भाऊ, पत्नी व दोन लहान मुले आहेत. गिरीश हा घरातील कमावता असल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपविल्याने संपुर्ण कुटूंब उघडे पडले आहे. सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.

Web Title: marathi news jalgaon yung former suicide