ज्यांच्याविरुद्ध संघर्ष, त्यांच्याशी युती नकोच! : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आपला वैयक्तिक विरोध नाही; परंतु त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे. त्या प्रवृत्तीविरुद्ध आपण तब्बल 25 वर्षे संघर्ष केला. विरोधी पक्षात असताना टक्कर दिली. आज तर देशात व राज्यात सत्ता आहे. मग, ज्यांच्याशी भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्याशीच युती करणे हे आपल्या मनाला पटत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

शहरातील "मुक्ताई' निवासस्थानी ते म्हणाले, की भाजप- शिवसेना- खानदेश विकास आघाडी युती झाली की नाही, याबाबत आपणास माहिती नाही; परंतु युतीचा प्रस्तावही आपल्याला योग्य वाटत नाही. 25 वर्षे त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला आहे. विरोधी पक्षात असताना तब्बल 34 नगरसेवक निवडून आणले होते. आज तर पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. जनताही भाजपसोबतच आहे. अशा स्थितीत ही युती करणे आपल्याला पटत नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बोलणार आहोत. 

महाजनांच्या नेतृत्वातही काम 
पक्षाने चांगल्यासाठी निवडणुकीत जी भूमिका घेतली, ती आपणास मान्य राहील. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीही आपण काम करण्यास तयार आहोत. 

Web Title: marathi news jalgaon yuti khadse