जि. प. अध्यक्षपदासाठी खडसे गटातून नाव पुढे 

जि. प. अध्यक्षपदासाठी खडसे गटातून नाव पुढे 

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष निवड कार्यक्रमाला स्थगिती मिळाल्याने येथील राजकीय हालचाली थोड्या थंडावल्या आहे. असे असले तरी अध्यक्षपदासाठी दावेदाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. तर दुसरीकडे खडसे गटातूनही अध्यक्षपदासाठी नाव पुढे केले जात असून, यास भाजपसह विरोधी गटातील सदस्यांचा देखील पाठिंबा राहणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रत्यक्ष निवडीच्या दिवशी राजकीय नाट्य पाहण्यास मिळणार आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अशात विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 20 डिसेंबरला संपुष्टात येत असून, 21ला होणारी निवड प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर पंधरा दिवस तरी प्रशासक बसण्याची शक्‍यता अधिक आहे. स्थगितीमुळे गतिमान झालेल्या राजकीय हालचालींना विराम मिळाला आहे. मात्र जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी करण्याच्या धूसर झालेल्या आशा पुन्हा जिवंत झाल्या असून, शिवसेना व राष्ट्रवादीकडून सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

खडसेंची भूमिका बदलविणार चित्र 
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा पक्ष बदलाची चर्चा अधिक दाट झाली असून, त्याचा परिणाम जिल्हा परिषदेवर पडू शकणार आहे. कारण जिल्हा परिषदेत भाजपमध्ये महाजन आणि खडसे असे दोन गट असल्याचे सर्वश्रुत आहे. खडसेंनी पक्षांतर केल्यास जिल्हा परिषदेतील तो गट फुटण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेवर भाजपचेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असणार असा दावा विद्यमान पदाधिकारी करीत आहे. 

खडसे गटही तयारीत 
सत्तेत असलेल्या भाजपमध्ये दोन गट पडले असून, अध्यक्षपदासाठी रजनी चव्हाण आणि नंदा पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र खडसे गटातून महिला उमेदवाराचे नाव पुढे केले जात आहे. या नावाला भाजपच्याच नव्हे तर विरोधी गटातील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांचा देखील पाठिंबा राहणार आहे. 

महाविकास आघाडीचे प्रयत्न 
दोन सदस्य अपात्र ठरल्याने जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी 33 सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. जे भाजपकडे सध्या स्थितीला उपलब्ध आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे मिळून 32 सदस्य होत आहे. असे असले तरी देखील जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याकरिता भाजपच्या नाराज गटातील सदस्यांचा छुपा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय, निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या दरम्यान अपात्र ठरलेल्या सदस्यांचा निकाल लागण्याची शक्‍यता असून, सदस्यांच्या बाजूने निकाल लागल्यास महाविकास आघाडीचे बहुमत सिद्ध होऊ शकते. अर्थात जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी येण्याची शक्‍यता देखील निर्माण झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com