घराघरांत पोहचणार नळ कनेक्‍शन अन्‌ बसणार मीटर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

जळगाव : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी देता यावे; यासाठी केंद्र शासनाकडून जलजीवन योजना राबविली जात आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक गावात अन्‌ प्रत्येक घरात नळ कनेक्‍शन देवून चोवीस तास पाणी दिले जाणार आहे. नळ कनेक्‍शन देतानाच त्याला मीटर बसविले जाणार असून त्यानुसार पाणी बिल आकारणी केली जाणार आहे. 

नक्‍की पहा - सावधान इंडिया, "क्राईम पेट्रोल'च्या प्रभावातून आर्शिनचा बळी

केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन योजनेतंर्गत जिल्हा परिषदेकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून 20 फेब्रुवारीपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. 

चार वर्षात काम करणार पूर्ण 
ग्रामीण भागातील गाव, पाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे केंद्र शासनाने जलजीवन अभियान हाती घेऊन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्यासाठी योजना सुरू केली आहे. योजनेसाठी जिल्हाभरातून प्रत्येक गटविकास अधिकारी निहाय गावांचे आराखडे तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आराखडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावरून शासनाकडे 2 मार्चला आराखडा सादर केला जाणार आहे. योजनेसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीमधून अभियान राबविले जाणार आहे. 

प्रत्येक नळाला मीटर 
जलजीवन योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक नळाला मीटर लावण्याचे देखील काम योजनेतून केले जाणार आहे. उपलब्धतेनुसार प्रत्येक गावात चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी वापरासाठी मीटर रिडींगनुसार प्रत्येक महिन्याला बिल नागरिकांना भरावे लागणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon zilha parishad water jaljivan yojna centra goverment

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: