आयुर्वेदहबसाठी गारखेडा येथे जागेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

जामनेर : केंद्र सरकारच्या "आयुष" मंत्रालयातर्फे तालुक्‍यात "आयुर्वेदहब"च्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या जागेच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे कर्मचारी-अधिकारी यांच्या टीमने गारखेडा (ता. जामनेर) येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना गिरीश त्यांच्यासोबत उपस्थिती होत्या. 

देशातील पहिला प्रकल्प 
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे राबविण्यात येणारा हा पहिला प्रकल्प आहे. देशातील आयुर्वेद प्रणालीला महत्त्वाचे स्थान मिळावे आणि प्रत्येकाला स्वस्त आणि स्वास्थ्य मिळावे यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे गारखेडा येथील प्रस्तावित जागेची पाहाणी केल्याचे या टीमने पत्रकारांना सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्ली येथील भेटीत तालुक्‍यातील दुर्मिळ वनऔषधीविषयी आयुष मंत्रालयाला काही दिवसांपूर्वी सविस्तर माहिती दिली होती, शिवाय आयुर्वेदविषयक प्रकल्प उभा करण्यास आवश्‍यक जागेची उपलब्धता करुन देण्याचे सांगितले होते. यामुळे आज सायंकाळी उशिरा केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाचे डॉ. अग्रवाल, श्रीमती प्रिया मेसरी, डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. धनंजय, डॉ. संजय तलवलीक यांनी ही पाहणी केली. 
 
Web Title: marathi news jamner aayurved hub