नाशिकच्या कदंब वनात रोज भरतेयं पक्षीसंमेलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक 16 : येथील सातपूर-अंबड लिंकरस्त्यावरील वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या "कदंब' वनात रोज पक्षीसंमेलन भरतेय. विविध जातीचे रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटात हा परिसर हरवून जातो. वनाधिपतींची फुले-फळांनी बहरलेली परसबाग हे या भागाचे वैभव ठरले आहे. 

नाशिक 16 : येथील सातपूर-अंबड लिंकरस्त्यावरील वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या "कदंब' वनात रोज पक्षीसंमेलन भरतेय. विविध जातीचे रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटात हा परिसर हरवून जातो. वनाधिपतींची फुले-फळांनी बहरलेली परसबाग हे या भागाचे वैभव ठरले आहे. 

विनायकदादा मंत्री असतांना त्यांची एका कावळ्याशी गट्टी जमली होती. विनोदी लेखक रामदास फुटाणे यांनी दादांच्या काक प्रेमावर लेख लिहिला होता. दादांना कुणीतरी मोराचे दोन दोन अंडी दिली होती. दादांनी त्यातील एक अंडे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि दुसरे अंडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. दादांच्या बाबुल बंगल्यात प्रवेश करताच, प्रत्येकाला पक्ष्यांच्या माहेर घरात आल्याचा "फिल' होतो. परसबागेत तीस जातीच्या पक्ष्यांचा वावर आहे.

बंगल्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकल्यावर इतके पक्षी इथे का येतात ? असा प्रश्न तयार होतो अन्‌ चटकन डोळ्यापुढे उभ्या राहणाऱ्या सुंदर परसबागेतून त्याचे उत्तरही मिळते. वृक्षांविषयी असलेल्या जिव्हाळ्यातून त्यांनी देशी वृक्षांना स्थान दिलयं. इजिप्तमध्ये त्यांनी एका वृक्षाचा अनोखा प्रयोग पाहिला होता. तसा प्रयोग ते परसबागेत करत आहे. कडूलिंबाचा मांडव...कडूलिंबाचे अनेक वृक्ष लावून त्याचा मांडव करून त्यात कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. 

 टाकाऊतून टिकाऊचा प्रयोग,दुर्मिळ झाडांचा सहवाग 
सिलोनमधील सीता-अशोक हे दुर्मीळ झाड दादांच्या परसबागेत आहे. कवटी चाफा त्यांनी मोठ्या ड्रममध्ये लावून टाकाऊतून टिकाऊचा प्रयोग केला. कदंब, वांगीवृक्ष, भोकर, लीची, इजिप्तची चिंच हे वृक्ष लक्ष वेधून घेतात. या परसबागेत पक्ष्यांसाठी दाणा-पाणीची व्यवस्था करण्यात आली. शांत अन्‌ रम्य परिसर असल्याने पक्ष्यांना तो खूपच आवडला. वृक्षांवर घरटी लावण्यात आली आहेत. दयाळ आणि बुलबुल या पक्ष्यांनी घरात प्रवेश केला आहे. कदंबवनात तीन वर्षापूर्वी बिबट्याने हजेरी लावली होती. रात्री घुबड बंगल्याच्या प्रवेशद्वारावर येऊन बसतो. परसबागेत नाशिकमधील एकमेव असे हिमचंपा हा दुर्मिळ वृक्ष बहरलेला आहे. 

कोट 
""आमच्या परसबागेत देशी वृक्षांची लागवड केली. खाद्य-पाण्याच्या व्यवस्थेमुळे उन्हाळ्यात सुद्धा पक्ष्यांचा ऐकावयास मिळणारा किलबिलाट उत्साहवर्धक ठरतो. शहरवासियांनी आपल्या परसबाग, बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करायला हवी.'' 
- वनाधिपती विनायकदादा पाटील 
 

Web Title: marathi news kadab van samlean