कालीदासच्या दरात लवकरच तीस ते पन्नास टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदीराचे पुर्ननिर्माण होत आहे. मे अखेर पर्यंत नाशिककरांच्या सेवेत कालिदास दाखल होईल. पण सुविधांनी परिपुर्ण कालिदासचा नाट्यगृहाचा लाभ घेताना मात्र वाढीव कर द्यावा लागणार असून सध्याच्या करात साधारण तीस ते पन्नास टक्के वाढ करण्याचा विचार विविध कर विभागाकडून सुरु आहे. 

महापालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या तीन महिन्यांचा कार्यकाळात करवाढीच्या मुद्यावरून आयुक्त वादग्रस्त ठरले आहे. पदभार हाती घेतल्यापासून सातत्याने पालिके मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवेत वाढ होताना दिसतं आहे. रस्ते तोडणी, जलतरण तलाव, पार्किंग शुल्क, अतिक्रमण कारवाईतून उचलून आणलेल्या वस्तु परत देतेवेळी लागणऱ्रया चार्जेस मध्ये वाढ करण्यात आली.

मालमत्ता करामध्ये अठरा टक्के वाढीचा प्रस्ताव मंजुर करून घेतला असला तरी चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत करवाढ लागु झाली आहे. त्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात कर योग्य मुल्य दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. करवाढीचा निर्णय घेताना मोकळे भुखंड, पिवळ्या पट्ट्यातील शेती देखील कराच्या कचाट्यात आणल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

आचारसंहितेमुळे करवाढीवर निर्णय अद्याप प्रलंबित आहे. आता नाशिकचे सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या कालिदास कलामंदीरच्या भाडे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात असून सध्याच्या दरापेक्षा तीस ते पन्नास टक्के दरवाढ होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS KALIDAS NATYAGRAH RENT

टॅग्स