
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची माहिती संकलित झाल्याचे समजते. संबंधित विषयांच्या जागा रिक्त असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
कापडणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप प्राथमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. पहिलीच्या प्रवेशावर मोठा परीणाम झाला आहे. खानदेशासह राज्यात कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या वाढली आहे. शिक्षण विभागाने अतिरीक्त शिक्षकांची यादी तयार केल्याचे समजते. कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर समायोजन प्रक्रीया सुरू होणार आहे. खानदेशात एकशे पंधरा तर राज्यात एक हजार तीनशे शिक्षक अतिरिक्त आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील सुमारे दहा हजार शिक्षक नव्याने अतिरिक्त होणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आवश्य वाचा- शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण ! -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साडे आठ महिन्यांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. राज्यात दहा ते वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या साडेसतरा हजार शाळा आहेत. दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चार हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 29 हजार शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार या शाळांवरील दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. कोरोनामुळे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद असल्याने, सेवक संचही झालेला नाही. शाळा सुरू झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
अतिरीक्त शिक्षकांची माहिती संकलन
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची माहिती संकलित झाल्याचे समजते. संबंधित विषयांच्या जागा रिक्त असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात सुमारे तेराशे शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन सुरू आहे.
समायोजनाचा प्रश्न बिकट
दरम्यान धुळे जिल्ह्यात मुंबई व नागपूर नंतर अतिरीक्त शिक्षकांची संख्या अधिक आहे. एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द झाल्यास समायोजनाचा प्रश्न अधिक बिकट होणार नसल्याचे शैक्षणिक जाणकार सांगतात. तर पहिलीत एकतीस डिसेंबरपर्यंत पहिलीत नाव दाखल करता येणार आहे. त्यासाठी शिक्षकांसह पालकांनीही प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
वाचा- मध्य रेल्वेची तिकीट दलालांविरोधात मोठी कारवाई; १७४ गुन्हे दाखल
जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक
जळगाव (12), धुळे (70), नंदुरबार (33),
मुंबई (297), दक्षिण मुंबई (124), उत्तर मुंबई (188), ठाणे (93), रायगड (6), पुणे (22), कोल्हापूर (16), सोलापूर (17), सांगली (2), सिंधुदुर्ग (5), नागपूर (182), चंद्रपूर (53), वर्धा (10), गोंदिया (36), औरंगाबाद (24), जालना (10), बीड (51), लातूर (41), उस्मानाबाद (18), अकोला (15), वाशिम (4).
संपादन- भूषण श्रीखंडे