esakal | मस्त चिकन खा.. आणि तंदुरुस्त रहा !
sakal

बोलून बातमी शोधा

chicken-festival

पोल्र्टी हा शेतीपूरक व्यवसाय आहे. चिकन व अंडीमुळे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोरोना काळात चिकन अंडी अधिक उपयुक्त ठरले.

मस्त चिकन खा.. आणि तंदुरुस्त रहा !

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे  : चिकन फेस्टीवल हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. बर्ड फ्ल्यूमध्ये योग्य पध्दतीने शिजवून खावे. मृृृत पक्षी आढळल्यास योग्य पध्दतीने विल्हेवाट लावा. अंडी चिकन खा. अन तंदुरुस्त रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.

गोंदूर (ता.धुळे) येथील पोल्र्टी फाॅर्ममध्ये धुळे जिल्हा परीषदेतर्फे आज (ता.29) शुक्रवारी चिकन फेस्टीवल झाला. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते चिकन फेस्टीवलचे उध्दाटन झाले. यावेळी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, कृृषी सभापती बापू खलाणे, जिल््ह्हा््हा परीषद सदस्य राम भदाणे, पंकज कदम, विरेंद्रसिंग गिरासे, आशुतोष पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रा.विजय पाटील आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणा

जिल्हाधिकारी यादव म्हणालेत, शेतकर्‍यांच्या जिवनात आनंद आणा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पशू आरोग्य विभागाला कळवा. पोल्र्टी हा शेतीपूरक व्यवसाय आहे. चिकन व अंडीमुळे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोरोना काळात चिकन अंडी अधिक उपयुक्त ठरले. जिल्हा परीषद अध्यक्ष रंधे यांनी बर्ड फ्ल्युची भिती घालविण्यासाठी विविध उदाहरणे दिली. यावेळी सभापती बापू खलाणे यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केले. जगदीश पाटील यांनी सुत्रसंचलन केले. दिलिप साळुंके यांनी आभार मानले.

चिकन अंडी हा शेतकर्‍यांचा पूरक व्यवसाय आहे. आर्थिक परीस्थिती सावरुन दोन पैसे गाठीशी राहतात. बर्ड फ्ल्यूची भिती बाळगू नका. पण खबरदारी आणि काळजी घ्या.

- बापू खलाणे, कृृृषी सभापती

 

मी मांसाहारी आहे किंवा नाही हे सांगणार नाही. पण शासकीय अधिकारीने अधिक करावे मग सांगावे. या मताचा मी आहे. म्हणून मी आधी सेवन करतो. मग आता तुम्ही चिकनची मजा चाखा.
- संजय यादव, जिल्हाधिकारी

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे