esakal | आता कापसावर चिकाट्याचाही प्रादुर्भाव !
sakal

बोलून बातमी शोधा

आता कापसावर चिकाट्याचाही प्रादुर्भाव !

आॅक्टोबरपासूनच थंडी पडू लागल्याने कापसावर आता चिकाटा पडला. बोंडअळी आणि चिकाट्याने उत्तरार्धाचे बोंड फुटण्याचे व वेचण्याचे अडीचणीचे ठरले आहे.

आता कापसावर चिकाट्याचाही प्रादुर्भाव !

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : खरीपात सततच्या पावसाने कापसाची वाढ होवूनही त्यास बोंडे अधिक प्रमाणात आली नाहीत. त्यानंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. महिनाभरापासून बर्‍यापैकी थंडीत वाढ झाली आहे. पानांवर चिकाट्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कापूस काढण्याशिवाय पर्याय नाही. कापसावर रोटाव्हेटर फिरवून गहू व हरभर्‍यासाठी शेती तयार करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.

आवश्य वाचा- नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना; तूर पिकाला लागली उभळी
 
बोंडअळीसह चिकाटाही
सप्टेंबर पासूनच कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. फोरमन ट्रॅपचाही अधिक उपयोग झाला नाही. आॅक्टोबरपासूनच थंडी पडू लागल्याने कापसावर आता चिकाटा पडला. बोंडअळी आणि चिकाट्याने उत्तरार्धाचे बोंड फुटण्याचे व वेचण्याचे अडीचणीचे ठरले आहे. 

निम्मेटाईने कापूस वेचणी
उत्तरार्धाची कापूस वेचणी रोजंदारीने परवडत नाही. शेतकर्‍यांनी मजूरांनाच कापूस वेचा व निम्मे तुमचा निम्मे शेतकर्‍यास द्या. म्हणजे निम्मे बटाईने कापूस वेचला जात आहे. यामुळे मजूरांना दोनशे ते चारशे रोजंदारी सुटत आहे. हा कापूस वेचण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

आर्वजून वाचा-  जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी

अती पावसाने कापसात घट
खरीपात अती पाऊस झाला. कापसाची मोठी वाढ झाली. पण फलधारणा उशिरा झाली. कापूसही उशिरा निघू लागला. थंडीही पडू लागल्याने बोंडे फुटण्याऐवजी त्याच्यात बोंडअळिंनी बस्थान बसविले आहे. उत्पादनात घट झाली आहे.
- बन्सिलाल वंजी पाटील, शेतकरी  

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image