
गावांना प्रकाशमय करणारे कापडणे उपकेंद्रच अंधारात !
कापडणे : येथील धनूर रस्त्यालगतचे वीज उपकेंद्र (Substation) सुरळीत वीजपुरवठा (Power supply) करण्यात प्रसिद्ध आहे. काही तांत्रिक अडचणी (Technical difficulties) निर्माण झाल्यास तत्पर कर्मचारी तत्काळ दूर करतात. वीजबिल वसुलीचा टक्काही अधिक आहे. कापडणे (kapdne) आणि धनूर (dhnur) या दोन्ही गावांना प्रकाशमय करणारे हे उपकेंद्र मात्र दोन- तीन महिन्यांपासून अंधारात आहे. केंद्रांचे सारेच पथदीप (strrtlight) बंद आहेत. रात्री हे वीज उपकेंद्र आहे की उजाड माळरान, अशी स्थिती आहे.
( illuminates villages kapadne substation not power supply )
हेही वाचा: लॉकडाऊन वाढवले तर..भाजप असहकार आंदोलन करणार !
येथील वीज उपकेंद्र नियमित वीजपुरवठा आणि वीजबिल वसुलीत जिल्ह्यात क्रमांक एकवर आहे. गावातील पथदीप सुरू ठेवण्यासाठी अविरत प्रयत्नशील असतात. रात्री-अपरात्री कर्मचारी तांत्रिक दोष दूर करण्यासाठी धावपळ करतात. पण उपकेंद्र परिसरातील सर्वच पथदीप दोन-तीन महिन्यांपासून बंद आहेत.
कर्मचाऱ्यांची लोकवर्गणी
परिणामी हे केंद्र अंधारात निपचित पडले आहे. पथदीप सुरू करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांनीच लोकवर्गणी काढून पथदीप सुरू केले होते. मात्र अवघ्या आठ दिवसांत पुन्हा बंद पडले, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
( illuminates villages kapadne substation not power supply )
Web Title: Marathi News Kapadne Illuminates Villages Kapadne Substation Not Power
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..