esakal | कांदा ठेचा भाकरीची दादा भुसेंनी झोपडीत घेतला आस्वाद!
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Minister Dada Bhuse

कांदा ठेचा भाकरीची दादा भुसेंनी झोपडीत घेतला आस्वाद!

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील


कापडणे: येथील कांदा, मुळा, फ्लाॅवर, मिरचीची चवच लय न्यारी असते. येथील प्रत्येक कुटुंबाचे न्याहरी आणि जेवण कांदा, लसूण आणि ठेचाशिवाय पुर्ण होत नाही. या जेवणाची चव कृषी मंत्री दादा भूसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी घेतली. अन तृप्त झालेत. अन आपसूकच सगळ्यांच्या ओठांवर आले कापडणेकरांचा (kapadne) कांदा (Onion) ठेचा भाकरीची लज्जतच लय भारी...(agriculture ministerdada bhuse enjoyed the meal in the hut)

हेही वाचा: जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर 'बायोप्सी' ची शस्त्रक्रिया!कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील पिक पाहणी केली. पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीमध्ये जिल्ह्यातील सरवड (ता.धुळे) शिवारात मंञी दादा भुसे यांनी पिकांची पाहणी केली. शेतीतील माती उकरत ओलावा बघितला. वेळ गेलेली नाही. उत्पादनात निश्चितच घट येईल असे सांगितले. यानंतर मंत्री भोसले सोंडले येथे एका कार्यक्रमाला गेलेत.मंत्री दादा भूसे हे दोंडाईचाकडे जातांना सावळदे (ता. शिंदखेडा) येथील एका झोपडीत थांबले. येथे फ्लॉवर, भेंडी, मटकी, कांदा लसूनमिरचीचा ठेचा, पोळी, भाकर व पापड या जेवणाचा आस्वाद घेतला आणि तृप्त ढेकर दिला.

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात जळगावमध्ये काँग्रेसतर्फे साकल रॅली

सासूसुनांनी बनविले भोजन
दरम्यान कापडणे येथील आदर्श शेतकरी संभाजी पाटील व महेश पाटील, निवृृत्त शिक्षिका शोभना पाटील आणि प्रतिभा पाटील या सासू सुनांनी हे सुग्रास भोजन तयार केले होते. दरम्यान खानदेशात कांदा, लसूण, मिरची ठेचा याची लज्जतच न्यारी असते. पाहुण्यांना हे जेवण म्हणजे एक मेजवानी असते. त्याची अनुभूती मंत्री भुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली.

loading image