esakal | कोणी फुकटात चारा घेता का ! शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्‍कल 
sakal

बोलून बातमी शोधा

कोणी फुकटात चारा घेता का ! शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्‍कल 

धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड झाली आहे. मका काढणीला आला आहे. वादळी आणि मुसळधार पावसाने नुकसानही झाले आहे.

कोणी फुकटात चारा घेता का ! शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्‍कल 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

 कापडणे  : यावर्षी आठ जूनपासून सतत पाऊस पडत आहे. शेती शिवारातील बांधासह पडीक गायरानावर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजरी आणि मक्याची काढणी सुरू झाली आहे. मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाला आहे. हा चारा गुरे असलेल्या शेतकऱ्यांनी मोफत नेण्याचे आवाहन शेतमालकांकडून करण्यात येत आहे. ‘कोणी मोफत चारा घेता का चारा’ असे सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. 

आवश्य वाचा ः 'पाऊस सुसाट पण शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट' !  
 

चालू खरीप हंगामात पावसाने सरासरी ओलांडली आहे. नदी-नाले दोन महिन्यांपासून खळखळत आहेत. सर्वच बंधारे आणि धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. अधिकच्या पावसाने चाऱ्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली आहे. धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड झाली आहे. मका काढणीला आला आहे. वादळी आणि मुसळधार पावसाने नुकसानही झाले आहे.

चारा विकण्याचा फंडा

मात्र चारा भरघोस वाढला आहे. त्याच्या कापणीस मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. काढणी करूनही परवडणारा नाही. त्यापेक्षा मोफत विकण्याचा फंडा शेतकऱ्यांनी शोधून काढला आहे. धुळे तालुक्यात दुभत्या जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. धुळे शहर परिसरातील काठेवाडींकडे मोठ्या प्रमाणात गायी आहेत. ते मक्याच्या चाऱ्याचा अधिक लाभ घेत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top