अस्ताने येथे आगीमुळे कासार कुटुंब आले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

झोडगे : अस्ताने येथील उत्तम गणपत देवरे यांच्या घराला मंगळवारी (ता. 13) रात्री दहाला शाॅटसर्क्रिटमुळे आग लागली. आगीत भाडेकरू राजेश रमेश कासार या कटलरी व्यवसायीकाचे घर सामानासह कटलरी साहित्य जळून खाक झाले. घरासह सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आठवडे बाजार व गावोगावी फिरस्ती करीत कटलरी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे कासार कुटुंबतील सदस्य कष्टाने उभारलेला घरसंसार आगीत जळताना पाहून कोलमडून पडेल असून रस्त्यावर आले आहे.

मंगळवारी रात्री अचानक लागलेली आग पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडर जळाल्याने आगीची तीव्रता वाढली. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे खुप प्रयत्न केले. गल्लीत प्रत्येकाने हाती मिळेल त्या भांड्यातून पाणी आणून आग विझवणाचा प्रयत्न केला. येथील ग्रामविकास अधिकारी भास्करराव पाटील यांनी प्रसंगावधान राखुन तातडीने नळांना पिण्याचे पाणी सोडले. यामुळे ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी मोठी मदत झाली. महापालिका अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत आग आटोक्यात आली होती. आगीचे स्वरूप पाहून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

राजेश कासार या होतकरू तरूणाचा आगीत नष्ट झालेला संसार पाहून अनेकांचे डोळे पाणवले. घराला आग लागली तेंव्हा राजेशची मुले आई आमचे शाळेचे दप्तर काढणा. आमचे पुस्तके वह्या अगोदर काढना असे सांगत होते. शासनातर्फे तलाठी पी.एन.बनसोड व ग्रामविकास अधिकारी भास्करराव पाटील यांनी पंचनामे केला. शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवू असे त्यांनी सांगितले. कासार कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. 

Web Title: marathi news kasar family house in fire