काझीगढीवासीयांना घरकुल योजनेत पुनर्वसन करण्याचे आयुक्तांचे आश्वासन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

नाशिकः जुन्या नाशिकमधील काझीगढीवासीयांच्या पुनर्वसनासाठी चुंचाळे शिवाराचा पर्याय सुचविण्यात आला आहे. चुंचाळे येथील घरकुले ताब्यात देऊनही तेथे वास्तव्याला न गेलेल्या नागरिकांची कागदपत्रे तपासून काझीगढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तयारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दर्शवली आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 8) महापालिका मुख्यालयात काझीगढीसंदर्भात बैठक बोलावली होती. महापौर रंजना भानसी, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

नाशिकः जुन्या नाशिकमधील काझीगढीवासीयांच्या पुनर्वसनासाठी चुंचाळे शिवाराचा पर्याय सुचविण्यात आला आहे. चुंचाळे येथील घरकुले ताब्यात देऊनही तेथे वास्तव्याला न गेलेल्या नागरिकांची कागदपत्रे तपासून काझीगढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तयारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दर्शवली आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 8) महापालिका मुख्यालयात काझीगढीसंदर्भात बैठक बोलावली होती. महापौर रंजना भानसी, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील आदी उपस्थित होते. तीन-चार दिवसांपासून शहर व परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने जुने नाशिकमधील काझीगढीचा काही भाग ढासळण्यास सुरवात झाली होती. स्थानिक नागरिकांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत घरे खाली न करण्याची भूमिका घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kazigadi gaharkul yojna