अरब देशात केळीची रोज दीडशे टन निर्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

रावेर : वाढत्या तापमानाबरोबर दर्जेदार, निर्यातक्षम केळीची कापणी वाढत आहे. त्यामुळे तालुक्‍यातून सध्या अरब देशांत केळीची रोज सुमारे दीडशे टन निर्यात होत आहे. रावेर तालुक्‍यातील तांदलवाडी हे या निर्यातीचे केंद्र बनले आहे.

वाढत्या उन्हामुळे केळीच्या कापणीचा वेग वाढला आहे. त्यातच अरब देशात खानदेशी केळीची मागणी वाढली आहे. इराण, इराक, दुबई, संयुक्त अमिराती, तुर्कस्तान, सिंगापूर आदी देशांत ही केळी मुंबईतून जहाजाद्वारे रवाना होत आहे. या देशांत केळी निर्यात करण्यासाठी विविध खासगी कंपन्यांबरोबरच शेतकऱ्यांनीही पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

तांदलवाडी येथील राज्य शासनाने कृषी पुरस्कार प्रदान केलेले शेतकरी प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन या दोघा युवा शेतकऱ्यांनी निर्यातीत आघाडी घेतली आहे. त्यांच्या महाजन एक्‍स्पोर्ट या कंपनीने मागील 15 दिवसांत रोज सरासरी तीन कंटेनर केळी (सुमारे 60 टन केळी) निर्यात केली आहे. यात या दोघा शेतकऱ्यांशिवाय अन्य छोट्या शेतकऱ्यांचीही केळी होती, हे विशेष..! या वर्षी किमान 200 कंटेनर केळी निर्यात करण्याचे महाजन बंधूंचे उद्दिष्ट आहे.

सध्या ते थेट केळी बागेतून कापणी करून पॅकेजिंग करीत आहेत. लवकरच त्यांचे प्रीकुलिंग युनिट सुरू होणार आहे. जळगावच्या जैन कंपनीने देखील रोज किमान एक कंटेनर केळी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असून, ऐन थंडीत डिसेंबर-जानेवारी महिन्यात त्यांनी यावल, चोपडा तालुक्‍यातील केळी निर्यात केली. थंडीतही दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी कंपनीने विशेष तंत्र विकसित केल्याचे कंपनीचे प्रतिनिधी राहुल भारंबे यांनी सांगितले. 

कोल्हापूरच्या कंपनीचा सहभाग
कोल्हापूरच्या एकदंत एक्‍स्पोर्ट या कंपनीनेही या आठवड्यात निर्यातीला वेग दिला आहे. या कंपनीने तांदलवाडी येथे प्रीकुलिंग युनिट उभारले आहे. या कंपनीचेही दोनशे कंटेनर केळी जिल्ह्यातून निर्यातीचे उद्दिष्ट आहे. याशिवाय रावेर, वाघोदा, सावदा, फैजपूर आदी ठिकाणी जे पॅकेजिंग चालते, त्यातील केळी काही प्रमाणात पाकिस्तानला निर्यात होत आहे; तर बहुतांश केळी देशातील मोठ्या शहरातील मॉल्समध्ये पाठविण्यात येत आहे.

तांदलवाडी निर्यात केंद्र
केळी निर्यातीत सध्या तांदलवाडी येथील शेतकऱ्यांची आघाडी आहे. येथील शेतकऱ्यांनी सुमारे 15 लाख टिश्‍यूकल्चर केळी रोपांची लागवड केली आहे. दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी आवश्‍यक ते तंत्र, खते, पाणी, मल्चिंग, स्कर्टिंग बॅग्स, फवारणी आदी मार्गांचा प्रभावी वापर येथील शेतकरी करीत आहेत. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांची केळी निर्यातक्षम आहे. म्हणून निर्यातदारांनाही तांदलवाडीचे आकर्षण असून, अरब देशात निर्यात होणाऱ्या केळीत येथील केळीचा सिंहाचा वाटा आहे. त्या खालोखाल ऐनपूर, वाघोदा, निंबोल, दसनूर, न्हावी, यावल तालुक्‍यातील चितोडे, चोपडा तालुक्‍यातील गोरगावले आदी गावांतूनही केळी अरब देशांत आणि सिंगापूर येथे निर्यात होत आहे. निर्यात होणाऱ्या केळीला मागील आठवड्यात 375 रुपये क्विंटल जादा भाव मिळत होता. आता कापणी वाढल्याने सुमारे 200 रुपये क्विंटल जादा म्हणजे 1400 रुपये भाव मिळत आहे. 
 
Web Title: marathi news kedi niryat