जि.प.सदस्य हिरामण खोसकरांसह इतरांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

live
live

नाशिक नाशिक जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य हिरामण खोसकर यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे,भारतीताई भोये,मोतीराम दिवे यांनी आज संगमनेर येथे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. त्यात इगतपुरी,त्र्यंबकेश्वरमधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. 

विधानसभेच्या निवडणूकीसाठी आज आचारसंहिता निश्‍चित झाला. त्यापूर्वीच श्री.खोसकर यांच्यासह इतरांनी प्रवेश करत राजकारणात चुरस निर्माण केली आहे. इगतपुरीचे मा.सभापती गोपाळा लहांगे यांनी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोतकर,भारतीताई भोये,मोतीराम दिवे,कैलास बेंडकुळे हे राष्ट्रवादीतुन कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. 

इगतपुरी, देवळालीसाठी आपले नशीब अजमावण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. या प्रवेशामुळे जिल्हा परिषदेतील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. संगमनेर येथील प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे,शहराध्यक्ष शरदराव आहेर,माजी जि.प.उपाध्यक्ष संपतराव सकाळे,जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ता प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष रमेश कहांडोळे,उत्तमराव भोसले,मधुकर लांडे,तालुकाध्यक्ष रामदास धांडे,कचरू पा.शिंदे,नार्दन माळी,मधुकर कोकणे,युवक कॉंग्रेसचेभास्कर गुंजाळ,अरुण गायकर,मा.सभापती आनंदराव सहाणे,वसंतराव मुसळे,भारत टाकेकर,मधुकर कोकणे आदी उपस्थित होते. 
लोकशाही मजबूत करण्यासाठी साथ द्या 

प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले,कॉंग्रेसला मोठी जुनी परंपरा आहे. कॉंग्रेस पक्ष हा लोकशाही मजबूत करणारा व नागरिकांना विकासा समवेत घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांसाठी शाश्वत विकासाची परंपरा असलेला हा पक्ष आहे. विद्यमान भाजप-सेना सरकारने फक्त जाहिरातबाजी केली असून जनतेला फसवले आहे. वाढती बेरोजगारी,आर्थिक मंदी,ढासळलेली अर्थव्यवस्था,अडचणीत आलेला शेतकरी ,वाढलेली महागाई या सर्व समस्या घेऊन कॉंग्रेस पक्ष लढत आहे. श्री. खोसकर म्हणाले,कॉंग्रेसचा विचार हा गोरगरिबांच्या विकासाचा असून ईगतपुरी-ञ्यंबकेश्वर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.आपण पुरोगामी विचारांच्या पक्षात सामील झाल्याचा आनंद असून पक्ष देईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक संपतराव सकाळे यांनी केल. प्रा.ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी आभार मानले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com