ऍड कोकाटेचा मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपकडे आग्रह,मूहूर्तावर भरला अर्ज, 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नाशिक ः नाशिक लोकसभा मतदार संघातून आज माजी आमदार ऍड माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.. मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी आग्रह धरला. 

नाशिक ः नाशिक लोकसभा मतदार संघातून आज माजी आमदार ऍड माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.. मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी आग्रह धरला. 

ऍड कोकाटे यांनी आज 12 वाजून 2 मिनीटांच्या मूहूूर्त साधला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी कॉग्रेसचे माजी नगरसेवक राजीव टर्ले, शशीकांत गाडे,सभापती विनायक तांबे आणि संभाजी जाधव हे चौघे उपस्थित होते. दुपारी बरोबर मूहूर्तावर आल्यानंतर घडाळ्याच्या काट्यानुसार त्यांनी निवडणूक आधिकारी, नाशिकचे 
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रस्थापित दोन्ही उमेदवार मतदारांना नको असल्यामुळेच ऍड कोकाटे यांची उमेदवारी आहे. त्यानुसार 9 एप्रिलला जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचेही यावेळी कोकाटे व त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले. 

21 कोटीची संपत्ती 
ऍड कोकाटे यांची स्वताच्या नावावर 1 कोटी 13 लाखाची चल तर 15 कोटी 21 लाखाची अचल संपत्ती आहे. तर पत्नी आणि मुलगी अशा संपूर्ण परिवाराच्या नावावर 
ठेवी, शेअर्स, सोने नाणे यासह सुमारे 3 कोटी 8 लाखांची संपत्ती आहे. त्यात, ऍड कोकाटे यांना व त्यांच्या पत्नीला मिळून सासुरवाडीचे सुमारे 3 किलो सोने मिळाल्याचा उल्लेख आहे. इनोवा,बुलेट, ट्रॅक्‍टर कायनॅटीक होंडा अशी वाहन आहे. कुटुंबाच्या नावावर वडिलोपार्जित व स्वकमाईची मिळून त्यात्या वेळच्या बाजारभावानुसार सुमारे 18 कोटी 36 लाख 12 हजाराची अचल संपत्ती आहे. त्यात, विसे मळा, नयनतारा येथील सदनिकांचा समावेश आहे.धरणगाव, सोमठाणे, शिलापूर, ओढा, घोरवड, मापरवाडी अशी ठिकठिकाणी सुमारे 18 एकर जमीन आहे. तर गृहकर्जासह विविध प्रकारचे सुमारे 4 कोटी 67 लाखांचे कर्ज आहे. 

 

Web Title: marathi news kokate form