esakal | मेट्रो स्थानकालगच्या भूखंडांना "अच्छे दिन', जागा बुक करण्याचे प्रयत्न सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

मेट्रो स्थानकालगच्या भूखंडांना "अच्छे दिन', जागा बुक करण्याचे प्रयत्न सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकः मुंबई, ठाणे शहरात घर घेताना किंवा व्यवसायासाठी रेल्वे स्थानकाच्या परिसरात जागेचा शोध घेतला जातो. स्टेशनपासून दूर जाऊ त्याप्रमाणे जागांचे दर, कमी होतात. भविष्यात नाशिक शहराच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्याला कारण म्हणजे देशातील पहिली टायरबेस एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प नाशिकमध्ये साकारला जात आहे. त्यासाठी तीस स्थानकांची निर्मिती केली जाईल. आयता ग्राहक मिळणार असल्याने स्टेशनच्या परिसरातील जागांचे भाव वाढणार असून आताच या भागातील जागा बुक करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने हा भाग नाशिकचे व्यावसायिक केंद्रे म्हणून उदयाला येणार आहे. 
   

देशातील पहिल्या हायस्पीड टायरबेस एलिव्हेटेड "मेट्रो निओ' प्रकल्पाला राज्य शासनाने गेल्या महिनाअखेर मंजुरी दिली. 2100 कोटींचा हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल. 31 किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड मार्गावर 25 मीटर लांबीच्या दीडशे प्रवासी क्षमतेची बस धावतील. मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात दोन मार्ग निश्‍चित केले आहेत. पहिला टप्पा 10 किलोमीटरचा तर दुसरा टप्पा 22 किलोमीटरचा आहे. महामेट्रोसाठी 2100 कोटी रुपये खर्च येणार असून, प्रकल्पाच्या एकूण किमतीपैकी 60 टक्के 1161 कोटी रुपये केंद्र सरकार कर्जाच्या स्वरूपात उभारणार आहे. उर्वरित 40 टक्के रक्कम राज्य सरकार, महापालिका व सिडकोतर्फे 552 कोटी रुपये उभारले जातील. केंद्र सरकारकडून 387 कोटी रुपये प्रकल्पासाठी मिळणार आहेत. 

व्यवसायाची नवी केंद्रे 
शहरात शालिमार, मेन रोड, सीबीएस, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मुंबई नाका, द्वारका हे भाग पारंपरिक व्यवसायाचे केंद्रे आहेत. त्याव्यतिरिक्त सिडको, नाशिक रोड, सातपूर, पंचवटी, देवळाली कॅम्प या उपनगरांत वर्दळीच्या भागात व्यावसायिक केंद्रे तयार झाली आहेत. परंतु मेट्रोनिमित्ताने नव्याने तयार होणाऱ्या स्थानकांमुळे या भागाच्या व्यवसायांवर मर्यादा येऊन नवीन व्यावसायिक केंद्रे विकसित होतील.

पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर गंगापूर पहिले स्थानक असेल. आतापर्यंत गंगापूर भागाला आर्थिकदृष्ट्या महत्त्व नव्हते. परंतु आता पहिल्या स्थानकामुळे या भागाचे महत्त्व वाढेल. टप्प्याटप्प्याने जलालपूर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी या स्थानकांच्या परिसरात नवे बिझनेस सेंटर तयार होतील. दुसऱ्या मार्गिकेवरील ध्रुवनगर, श्रमिकनगर, सातपूर कॉलनी, मायको सर्कल, नाशिक रोड भागातील टाकळी रोडवरील समतानगर, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर या भागात नवीन बिझनेस सेंटर उदयाला येतील. 

loading image
go to top