शक्तीप्रदर्शनापेक्षा इतर कारणांनीच गाजली यात्रा,  झेंडे बांधायला काळ्या कापडाचा वापराची चर्चा 

live
live

नाशिक ः महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शनाची चर्चा रंगलीच. पण सोबतच मुसळधार पाउस, प्रशासकीय यंत्रणेचा यात्रेसाठी वापर, मनसे सह विरोधकांना नोटीसा, ऐन मोक्‍याच्या क्षणी वीज गायब अशा अनेक कारणांनी महाजनादेश यात्रा चांगलीच गाजली.

एका बाजूला विरोधकांनी काळे झेंडे दाखवू नये म्हणून पर्यावरणप्रेमीसह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या.पण व्हिक्‍टोरिया पूलावर मात्र भाजपचे सगळे झेंड फक्त काळ्या फडक्‍यांनी बांधले होते. त्यामुळे हा निषेध कि अपशकून अशीही दस्तुरखुध्द भाजपमध्येच चर्चा रंगली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती नाशिकमध्ये आज भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा निघाली. पाथर्डी ते पंचवटी दरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे यात्रेची चर्चा होती. चौकाचौकात होल्डींग, भाजपचे ध्वजाचे जाळे, सजविलेले चौक, प्रमुख चौकात एलईडीची सोय, यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख चौकाचौकात भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. प्रमुख चौकात यात्रेचे स्वागत करण्यासाठी व्यासपिठ टाकले होते. भव्य रंगोळ्या काढलेल्या होत्या. भाजपच्या शक्तीप्रदर्शनाची त्यामुळे चांगली चर्चा होतीच. एलईडीद्वारे शासकीय योजनांची आणि मुख्यमंत्र्याच्या भाषणाच्या व्हिडीओ क्‍लिपही दाखविल्या जात होत्या. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने चौकाचौकात गर्दी आर्कषित करण्यात भाजपला निश्‍चितच यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com