तहकूब महासभा महापौरांनी गुंडाळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नाशिक- ऑगष्ट महिन्यातील महासभेत तहकुब करण्यात आलेले विषयांवरून शिवसेनेने भाजपला घेरल्यानंतर पुन्हा नवीन महासभा घेण्याचे आश्‍वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले होते. त्यासाठी शुक्रवारी महासभा घेण्याचे आदेश देखील दिले मात्र आज नगरसेवक महासभेला पोहोचल्यानंतर महासभाचं नसल्याचे महापौरांनी सांगत घुमजाव केले तर तहकुब विषय परस्पर गुंडाळल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

नगरपरियोजनेसह विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी महापौर भानसी यांनी सोमवारी महासभा बोलाविली होती. परंतू विषय पत्रिकेवर गेल्या महासभेत तहकुब करण्यात आलेल्या विषयांचा समावेश नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत धारेवर धरले. गेल्या महासभेत तहकुब करण्यात आलेल्या विषयांमध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या सिबिएसई पॅटर्नच्या शाळा सुरु करणे व सिंहस्थाच्या कामातील 17 कोटी रुपयांच्या देयकांना मंजुरी देण्याचा महत्वाचा विषय होता.

   सोमवरच्या सभेत या विषयांवर महापौरांकडून चुप्पी साधण्यात आल्यानंतर गोंधळ उडाला. स्मार्ट नगर परियोजनेचा महत्वपुर्ण विषय असल्याने तहकुब विषय घेता आले नसल्याचे महापौरांनी खुलासा केला होता. तहकुब विषयांसाठी स्वतंत्र सभा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. 13) सभा घेण्याचे आश्‍वासित करण्यात आले परंतू आज महासभा झालीचं नाही नगरसेवकांनी महापौरांना महासभेची विचारणा केल्यानंतर अशी कुठलीचं सभा नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता आचारसंहिता लागु झाल्यानंतर तहकुब विषय देखील गुंडाळले जाण्याची शक्‍यता आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news MAHASABHA