नवविवाहितेवर मेहुण्यासमोर चौघांचा बलात्कार

प्रमोद सावंत
बुधवार, 7 मार्च 2018

मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागातील एकोणीस वर्षीय नवविवाहित व तिच्या मेहुण्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून रमजानपुरा भागात नेत मेहुण्यासमोर चौघांनी मेहुणीवर बलात्कार केला. सोमवारी (ता. ५) रात्री हा प्रकार घडला. मेहुण्याला दमबाजी व जीवे मारण्याची धमकी देत चौघांनी वीस हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने बलात्काराचा प्रकार घडला. शहर पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित माजीद एकबाल कुरेशी (२२, रा. रमजानपुरा) याला अटक केली आहे. अन्य तीन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेने पुर्व भागात खळबळ उडाली आहे.

या बाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, गोल्डननगरातील नवविवाहिता तिच्या बहिणीचा पती मेहुणा मुन्ना समवेत दुचाकीवर बसून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जात होती. खड्डाजिन भागात माजीद कुरेशीसह सोहेल, सलमान व आसिफ (तिघांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत) चौघांनी त्यांची दुचाकी अडविली. दोघांना जबरदस्तीने दोन वेगवेगळ्या दुचाकीवर बसवून रमजानपुरा परिसरातील बोरचा मळा भागात नेले. येथे चौघांनी खंडणी व तोडीपाणी करण्याच्या इराद्याने दोघांना मारहाण करत वीस हजारांची मागणी केली. मुन्ना याने रक्कम देण्यास नकार दिल्याने त्याला पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत चौघांनी त्याच्या समोरच मेहुणीवर बलात्कार केला.

सोमवारी रात्री आठ ते साडेअकरा दरम्यान हा खळबळजनक प्रकार घडला. संशयितांनी मुन्नाची जुनी दुचाकी व मोबाईलही लंपास केला. मंगळवारी दुपारी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द बलात्कार, अपहरण, मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक गजानन राजमाने, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर चौकशी केली. पोलिसांनी यातील मुख्य संशयित माजीद कुरेशी इकबाल कुरेशी (२२, रा.रमजानपुरा) याला मंगळवारी अटक करण्यात आली. पोलिस अन्य तिघा संशयितांचा शोध घेत अाहेत.

मेहुणा सामान्य रुग्णालयात मेहुणीला घेऊन जात असतांना दोघांचे प्रेमसंबंध वा अनैतिक संबंध असावेत. त्यांना दमबाजी करुन खंडणी उकळू असा संशयितांचा हेतू असावा. खंडणी न मिळाल्याने त्यातून हा खळबळजनक प्रकार घडला. माजीदला न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा अादेश दिला आहे. 

Web Title: Marathi news malegao news rape on newly married bride in front of relative