दोन कोटीतच साधा मानव विकास,अजब सल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नाशिक : दरडोई उत्पन्न कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील सव्वाशे तालुक्‍यांचा मानव विकास सात वर्ष आरोग्य आणि शिक्षण यातच रांगल्यानंतर आता सव्वाशेतील 25 तालुक्‍यात रोजगाराभिमुुख कार्यक्रमाचे वारे वाहु लागले आहेत. प्रत्येक तालुक्यासाटी दोन कोटीत विकास साधण्याचे आव्हान आहे.

नाशिक : दरडोई उत्पन्न कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील सव्वाशे तालुक्‍यांचा मानव विकास सात वर्ष आरोग्य आणि शिक्षण यातच रांगल्यानंतर आता सव्वाशेतील 25 तालुक्‍यात रोजगाराभिमुुख कार्यक्रमाचे वारे वाहु लागले आहेत. प्रत्येक तालुक्यासाटी दोन कोटीत विकास साधण्याचे आव्हान आहे.

सन 2011 च्या सुमारास राज्यात सव्वाशे तालुक्‍यात मानव विकास कार्यक्रम सुरु झाला. समवेश झालेल्या तालुक्‍याला प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यास सुरवात झाली.संपुर्ण रज्यासाठी तीनशे कोटीचा निधी मंजुर झाला. आरोग्याच्या सुविधा देणे व शिक्षणाचे प्रमाण वाढवणे हा हेतु होता. या कार्यक्रमामुळे ज्या आदिवासी खेडयापाड्यात तज्ञ डॉक्‍टर कधीही दिसत नव्हते ते उपचार करु लागले.

.दर महिन्याला शिबीरे घेतल्याने माता मृत्यु व कुपोषण कमी करण्यास निश्‍चीत मदत झाली.तसेच मुलांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध करुन दिल्या. जेथे बसेस नाही. तेथे सायकली उपलब्ध झाल्या. त्यामुळे आरोग्य व शिक्षण यात विकास झाला, मात्र सात वर्षात हा विकास फक्त गरोदर माता,स्तनदा माता,त्यांची तपासणी,बुडीत रोजगार देणे,व शिक्षणासाठी बसेस उपलब्ध करुन सायकली वाटप करण्या पुरताच सिमीत आहे. 
रोजगारा साठी 25 तालुके 
आता सात वर्षानंतर मानव विकासात रोजगार वृध्दीचा समावेश झाला आहे.रज्यातील 25तालुके त्यात निवडले आहे.नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील दोन दोन तालुके त्यात समावीष्ट आहे.दरवर्षी तीनशे कोटी रुपयांत मानव विकास करुन पाहील्यानंतर आता त्यात 50 कोटीची वाढूव भर घातली आहे.व ते वाढीव 50 कोटी रुपये रोजगार वृध्दीसाठी दिले जाणार आहे. 

असा झाला लाभ 
नाशिक जिल्ह्यात या योजनेचे फलीत पहावयास गेल्यास नियमित तज्ञ डॉक्‍टारांरडुन तपासणी झाली. तसेच वेळीच चांगले औषध उपचार मिळाल्याने गेल्या वर्षात 10 हजार 64 अती जोखमीच्या गरोदर मातांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांना जीवदन मिळाले.तसेच 560 कुपोषीत बालकना कुपोषणातुन मुक्त केले. 
 

आकडे बोलतात. 
-नाशिक जिल्ह्यात आठ तालुक्‍यात दरवर्षी 50 हजार -729 मातांची तपासणी 
-1450 स्तनादा मातांवर नियमीत उपचार, 
-14 हजार 735 बालाकांना आरोग्य सुवीधा 
-56 बसेस उपलब्ध करुन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या मोफत -प्रवासावर तीन कोटी रुपये खर्च 
-सायकलीसाठी तीन हजारा एैवजी या पुढे साडे तीन हजार रुपये मिळणार. 
 

Web Title: marathi news manav vikas