चांदवडला पहिले मराठा प्रमाणपत्र वितरित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

निमोण -  अवघ्या एका दिवसात उत्तर महाराष्ट्रातील पहीले मराठा जात प्रमाणपत्र चांदवडला वितरित करण्यात आले..  

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर लगेचच शासननिर्णय काढून पुढील काळात मेघा भरतीत मराठा समाजाच्या तरूणांना संधी मिळावी यासाठी महसुल यंत्रणेला मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी च्या मार्गदर्शक सुचना केल्या होत्या.  त्यानुसार महाआँनलाईन ने बारा डिसेंबर लि आपल्या वेबसाईटवर मराठा जातीच्या प्रमाणपत्राचा नमुना उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर तात्काळ कागदपत्रांची छाननी करून अवघ्या तिनच दिवसात प्रमाणपत्र देण्यात आले.

 उत्तर महाराष्ट्रात पहीले मराठा जात प्रमाणपत्र चांदवड येथे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या च हस्ते वितरित करण्यात आले. पुढील काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

आगामी काळात महाराष्ट्र शासन ७२ हजार शासकीय पद भरण्याच्या तयारीत असून यातील पहिल्या टप्यातील ३६ हजार पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने आगामी काळात मराठा तरुणांची धावपळ होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्फत दहा मराठा तरुणांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान राज्यातील पहिलं मराठा जात प्रमाणपत्र मराठवाड्यातुन वितरित केलं आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातुन पहिलं मराठा जात प्रमाणपत्र हे चांदवड प्रांत कार्यालया अंतर्गत वाटप करण्यात आले आहे. 
 
Web Title: marathi news maratha certificate distribution