नाशकात जल्लोष अन संकल्पही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

नाशिक- क्रिकेट विश्‍वचषकात भारत विरुध्द वेस्ट इंडीजचा दमदार सामना असला तरी संपुर्ण नाशिककरांचे लक्ष आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा काय निर्णय लागतो याकडे होतो. न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भुमिका वैध ठरविण्याची माहिती दुरचित्रवाहीन्यांवरून झळकताचं नाशिक मध्ये जल्लोषाला सुरुवात झाली.

भर पावसात कुठे फटाके वाजवून तर कुठे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. समाजमाध्यमांतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले, एक मराठा, लाख मराठा, असे संदेश पोहोचताचं घरोघरी आनंद व्यक्त करण्यात आला. वैध आरक्षणाच्या उत्सवात सर्वचं राजकीय पक्ष सहभागी झाले. सांयकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील व पंचवटी कारंजा वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध मराठा संघटनांनी आनंद व्यक्त केला.

भाजपतर्फे पक्ष कार्यालयात जल्लोष करण्यात आला. शिवसेना भवन मध्ये देखील आनंदोत्सव साजरा झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिक मधून लाखोंचा मोर्चा काढण्यात आला. त्यापुर्वी जेथे मोर्चाचे केंद्र होते त्या ठिकाणी मोर्चाची धुरा सांभाळणारे भाजपचे उध्दव निमसे, शिवसेनेचे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे माजी आमदार जयवतं जाधव, कॉंग्रेसचे शैलेश कुटे, मनसेचे अनिल मटाले, छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर यांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. समाजाला आरक्षण मिळाले आता पुढे इतर समाजाला बरोबर घेवून समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याचा संकल्प केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news maratha reserveation jalosh