धुळ्यात अजूनही पावसाची प्रतीक्षाच! 

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 27 जुलै 2017

धुळे जिल्ह्यात तापी व पांझरा या दोन मोठ्या नद्या आहेत. तापीचा उगम मध्य प्रदेशातून आहे. ही नदी आता प्रवाही झाली आहे. या नदीचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही. पांझरा नदी ही जिल्ह्याला वरदान ठरणारी आहे. ती अद्याप कोरडीच आहे.

धुळे : श्रावण सुरू झाला तरीही धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतचे पावसाचे प्रमाण 'कभी खुशी, कभी गम' असेच आहे. कान नदीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले कोरडेच आहेत. 

गेल्या आठ दिवसांपासून परिसरात पावसाचे वातावरण आहे. पण जोरदार पाऊस पडलेला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. विहिरी कोरड्या आहेत. बागायती क्षेत्रही कमी झाले आहे. 

धुळे जिल्ह्यात तापी व पांझरा या दोन मोठ्या नद्या आहेत. तापीचा उगम मध्य प्रदेशातून आहे. ही नदी आता प्रवाही झाली आहे. या नदीचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही. पांझरा नदी ही जिल्ह्याला वरदान ठरणारी आहे. ती अद्याप कोरडीच आहे. महत्त्वाच्या अक्कलपाड्यात मृत साठा आहे. त्याचबरोबर बोरी, अमरावती, कनोली, बुराई, कान या मोठ्या नद्या आहेत. त्याही अद्याप प्रवाही झालेल्या नाहीत. काबऱ्या खडक वगळता सोनवद, अमरावती, देवभाने, बोरीवरील धरणांतही मृत साठा आहे. 

नदी-नाले वाहू लागल्यानंतरच विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी वाढते. सध्या उन्हाळ्याप्रमाणेच विहिरींची पाणी पातळी खालावलेली आहे. आठ दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. पावसाचे वातावरण असले, तरीही प्रत्यक्ष पावसाचा अभाव आहे. यास केवळ पिंपळनेर परिसराचा अपवाद आहे.

Web Title: marathi news marathi website monsoon rain Dhule Jagannath Patil