राख्या खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी 

रोशन भामरे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

तळवाडे दिगर : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी शहरीसह ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. लाडक्‍या भाऊरायासाठी आपल्या आवडीच्या राख्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. यंदा बाजारात युवावर्गात गाजलेल्या बाहुबली, तर बालकांतील डोरमोन, छोटा भीम, छोटा बबलूचाही प्रभाव पडल्याने त्यांना अधिक पसंती मिळत आहे; परंतु 'जीएसटी'मुळे आठ ते दहा टक्‍क्‍यांनी दर वाढल्याचे चित्र दिसले. 

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाला मोठे महत्त्व असून, बहीणभावाच्या प्रेमाचा आविष्कार घडविणारा हा सण श्रावणातील नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. दर वर्षी राखी खरेदी करून भावाला बांधावी, ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. या निमिताने सणातील महत्त्वाचे आकर्षण असलेल्या राख्या दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात मागविल्या आहेत. यात नवनवीन प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आहेत. बाजारपेठा राख्यांनी सजल्या असून, त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. राखी खरेदीला प्राधान्य देताना विविध प्रकारची आवडनिवड पाहिली जाते. भावाच्या हाताला शोभेल अशी राखी निवडण्यासाठी महिला, युवती दुकानांत योग्य राख्या शोधत आहेत. 

'बाहुबली'सह 'सैराट'मुळे बदललेला राख्यांचा ट्रेंड आणि कार्टून्सची क्रेझही कायम असून, दर वर्षी येणारे वेगळेपण यंदाही राख्यांनी जपले आहे. सोन्या-चांदीच्या प्लेटलेट राख्या बाजारात दाखल झाल्या आहे. त्यांची पारख व खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बहीणभावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून होणारा रक्षाबंधन सण येत्या सोमवारी (ता. 7) आहे. 

बदलत्या काळानुसार राख्यांतही बदल झाले आहेत. तालुक्‍यातील बाजारपेठेत चार दिवसांपासून राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. ठिकठिकाणी मनमोहक राख्यांचे स्टॉल सजले आहेत. खासकरून महिला, युवतींची राख्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. दुकानदारांनी पारंपरिक राख्यांबरोबरच यंदा सैराट, बाहुबली, जय मल्हार, छोटा भीम व सुती राख्यांनाही मागणी असल्याचे विक्रेते महेंद्र कासार यांनी सांगितले. पाचपासून तीनशे रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत.

Web Title: marathi news marathi website Raksha Bandhan Nashik news