राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळ्यात बुद्धिबळ स्पर्धा 

एल. बी. चौधरी
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळ्यातील क्रीडा भारती आणि रोटरी क्‍लब (क्रॉसरोड) यांच्या संयुक्त विद्यमाने पालेशा वाणिज्य महाविद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांच्या तीन तर मुलींच्या एकाच गटात ही स्पर्धा झाली. 

बुद्धिबळामुळे एकाग्रता वाढीस लागते. मुलांमध्ये बुद्धिबळाविषयी आकर्षण निर्माण व्हावे आणि त्याचा उपयोग शालेय जीवनात व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

12 वर्षांखालील मुलांच्या गटात दिग्नाग कुणाल वाघ याने प्रथम क्रमांक पटकाविला; तर अपूर्व अजय सुभेदार आणि अथर्व नितीन कुलकर्णी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. या गटात विधान शैलेश कामदार चौथ्या क्रमांकारवर राहिला. 

14 वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व प्रशांत साळुंखे हा पहिला आहा; तर हरीष देविसाद मेरगळ, भुवेश दादाजी वाघ आणि गंगेश सुरेश बोरसे हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात जय अमित गोराणे विजयी ठरला. वेदसागर राजेश सूर्यवंशी (द्वितीय), लोकेश गोविंदराव बागूल (तृतीय) आणि श्रद्धेश प्रदीप शिरुडे (चतुर्थ) हे खेळाडूही या गटात चमकले. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कुसुंबा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील भिकन चौधरी गेल्या 20 वर्षांपासून बुध्दीबळ प्रसारासाठी झटत आहेत. बहुतांश विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. 
क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष राजेश वाणी, भिकन क्ष श्रीकांत देशपांडे, मंत्री श्री. बारसे, शहराध्यक्ष मुन्ना तअग्रवाल, शहरमंत्री विनीत जैन यांनी संयोजन केले. 
पंच म्हणून मुकेश सोनवणे, संदीप इंगळे, आनंद परदेशी, कपिल पाटील, पवन पाटील, सचिन चव्हाण, श्री पारधी, श्री. परदेशी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Web Title: marathi news marathi websites Dhule news Sports news