मका खरेदीला मुदतवाढ द्यावी; नांदगावच्या बाजार समितीची शासनाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

नांदगाव : आधारभूत किमंती मध्ये मका खरेदीसाठी दिलेली मुदत संपून गेल्याने तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने ऑनलाईन खरेदीसाठीही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आज शासनाकडे केली.

नांदगाव : आधारभूत किमंती मध्ये मका खरेदीसाठी दिलेली मुदत संपून गेल्याने तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने ऑनलाईन खरेदीसाठीही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आज शासनाकडे केली.

बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांच्या नेतृत्वाखालील माजी सभापती विलासराव आहेर, उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विष्णू निकम, पंचायत समितीचे सदस्य भाऊसाहेब हिरे, जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, नगरसेवक ताठ, शिवसेना शहरप्रमुख किरण देवरे यांच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांची भेट घेऊन याबाबतची रीतसर मागणी शासनानेकडे नोंदविली.

अशाच प्रकारची मागणी नाशिक जिल्हा मार्केट फेडरेशनकडे नोंदविण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी शुक्रवारीच बाजार समितीच्या आवारात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. प्रत्यक्षात शनेश्वर नांदगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबर ला ऑनलाईन नोंदणीचे काम सुरु झाले. प्रत्यक्षात मात्र शासनाने मका खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ डिसेंबर ला संपली. त्यानंतरच्या शिलकी दोन दिवसाच्या या मुदतीत तालुक्यातून अवघ्या ७३५ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली.

त्यानंतर दिलेली मुदत संपल्याने आता ऑनलाईन नोंदणी करता येत नसल्याने हजारोच्या संख्येने मका उत्पदक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले या सर्व बाबींचा  मका खरेदीच्या व्यवहारावर परिणाम झाला त्यामुळे योजनेपासून वंचित राहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या मक्याचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे बाजार समितीच्या वतीने शासनाला मुदतवाढ मिळण्याची विनंती करण्यात आली आहे.

Web Title: marathi news marathi websites Nandgaon News Nashik News