चिमूरमध्ये प्रशासनाचा अतिक्रमणांवर बुलडोझर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

चिमूर : बेकादेशीरित्या अतिक्रमणाची नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने अतिक्रमणावर बुलडोझल चालवित जागा मोकळी केली. चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्रमांक 12 मधील चिमूर-वरोरा रस्त्यालगत आबादी प्लॉटमध्ये महसूल विभागाच्या जागेवर तीन व्यावसायिकांनी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण केले होते. 

या व्यावसायिकांनी जामा मशिदीसमोर तारांचे कंपाऊंड करून नागरिकांचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला होता. हुतात्मा स्मारकासमोर शाहीद चिकन सेंटरने गंगाधर नेवुलकर यांच्या घरासमोर अतिक्रमण केले होते. त्यामुळे घरातून येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला होता; तर तहसील प्रशासनाच्या जागेवर सद्भावना हॉटेल उभारून व्यवसाय सुरू केला होता. 

यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नगर प्रशासनाने याची दखल घेत महसूल विभागाला पत्रव्यवहार केला आणि अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस आठ दिवसांपूर्वी बजावल्या होत्या. अखेर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही अतिक्रमित जागा मोकळी केली. 

अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तहसीलदार संजय नाग तिलक, नायब तहसीलदार विनायक मगर, श्रीधर राजमाने, अतिरिक्त भिसीचे तहसीलदार रावळे, ठाणेदार दिनेश लबडे, पटवारी मडावी आदी प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: marathi news marathi websites Nashik News Chimur News