लासलगावला कांदा हब बनवून विकसित करणार : सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

विंचूर : राज्यातील कांदा उत्पन्ना पैकी नाशिक जिल्हातुन ३० ते ४० टक्के कांदा उत्पन्न होत आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठ ही लासलगाव असल्याने पुढील आठवड्यात रेल्वे मंञी सुरेश प्रभु समवेत मंञालयात बैठक घेवुन लासलगावला कांदा हब बनवुन विकसित करणार असल्याची कांदा उत्पादक शेतकर्यांना आजच ग्वाही देतो असल्याचे राज्याचे कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

विंचूर : राज्यातील कांदा उत्पन्ना पैकी नाशिक जिल्हातुन ३० ते ४० टक्के कांदा उत्पन्न होत आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठ ही लासलगाव असल्याने पुढील आठवड्यात रेल्वे मंञी सुरेश प्रभु समवेत मंञालयात बैठक घेवुन लासलगावला कांदा हब बनवुन विकसित करणार असल्याची कांदा उत्पादक शेतकर्यांना आजच ग्वाही देतो असल्याचे राज्याचे कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

येथील उपबाजार आवारावरील कांदा मार्केट उदघाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, ज्येष्ठ संचालक पंढरीनीथ थोरे, राजाभाऊ डोखळे, विंचूरच्या सरपंच ताराबाई क्षिरसागर, उपसरंपच आत्माराम दरेकर आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना खोत म्हणाले, ''पूर्वी शेतक-याकडे खळे असायचे. शेतातला माल खळ्यात जायचा. खळ्यातला माल बाजारात जायचा. आता खळे बंद झाले. त्यामुळे शेतातला माल डायरेक्ट बाजारात जात आहे. त्यामुळे भाव पडत आहे. त्यासाठी राज्यात आज जास्तीत जास्त वेअर हाऊस (शीतगृह) उभारण्याचा निर्णय घेत आहोत. नाफेडमार्फत खेरदी होत असलेली तूरडाळ 10 लाख मेट्रीक टनावरून 74 लाख मेट्रीक टन खरेदी केल्याने महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदाच खेरदी झाल्याचे नमूद केले. तसेच शीतगृहातला कांदा बाहेर काढल्यानंतर जास्त दिवस टिकत नसल्याने शेतक-यांकडे त्याची साठवणूक व्यवस्था असली पाहिजे. हे लक्षात घेऊन आपण या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या खात्याने 32 कोटी अनुदान दिले. तर सन 2017/18 या वर्षी 15 कोटी 28 लाख अनुदानाचे वाटप केले. कांदा उत्पादक शेतक-यांच्या हितासाठी कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यात व साठवणूकीवर निर्बंध येऊ देणार नाही असे सांगून, कांद्याबाबत शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय झाल्यास शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू अशी ग्वाही दिली.

प्राऱंभी ज्येष्ठ संचालक पंढरीनाथ थोरे यांनी प्रस्ताविकेतुन विंचूर धान्य उपबाजाराची सुरूवात 2004 साली झाली. त्यावेळी केवळ 16 पोते धान्यापासून सुरूवात झालेल्या उपबाजाराची उलाढाल आजरोजी सुमारे 100 कोटीपर्यत पोहोचली आहे. परिसरातल्या शेतक-यांची ब-याच दिवसांपासून येथे कांदा मार्केट सुरू व्हावे अशी मागणी सातत्याने होत होती.  त्यानुसार सभापती जयदत्त होळकर व संचालक मंडळाने येथे कांदा मार्केट सुरू करणेबाबत संमती दिल्याने आजपासून परिसरातील शेतक-यांची मागणी पूर्ण होत असल्याने समाधान लाभत असल्याचे सांगितले. लिलावानंतर शेतक-यांना एनईएफटी व्दारे त्यांच्या खात्यात तात्काळ पैसे वर्ग केले जाणार असल्याने राज्यात प्रथमच आँनलाईन पेमेंट करणारी विंचूर उपबाजार समिती ठरणार आहे. त्याचप्रमाणे येथील आवारावर प्रामुख्याने वांदा काढला जाणार नाही. शेतक-यांसाठी येथे सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

येथे उपबाजारासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने पणन मंडळाकडून वाढीव जागेसाठी मागणी केली. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आपल्या भाषणात कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून येणा-या काळात शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन कष्टकरी शेतक-याला माणूस म्हणून जगता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. त्याच प्रमाणे कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली आहे.

अध्यक्षीय भाषणाबाबत आमदार अनिल कदम यांनी सर्व पक्ष हे भारतीय जनता पक्षात विलीन करून संपूर्ण देश एक विचाराचा व्हावा. पण शेवटचा घटक असलेल्या शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करा अशी अपेक्षा व्यक्त केली.

सभापती जयदत्त होळकर यांनी शेतक-यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून
द्याव्यात तसेच शेतीमालाला रास्त भाव द्यावा, त्याचप्रमाणे लासलगाव येथे रेल्वे पोर्ट करावे त्यामुळे परदेशात माल पाठवता येईल.त्याचप्रमाणे निर्यातीसाठी असलेले अनुदान पाच टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात यावे, पावसामध्ये शेतक-यांचा माल भिजत असल्याने  बचावासाठी बाजार समितीत शेड उभारावे अशा मागणीचे निवेदन देऊन ना.खोत यांच्याकडे मागणी केली.

कार्यक्रमास संचालक बाळासाहेब क्षीरसागर, ललीत दरेकर, शिवनाथ जाधव, राजारम दरेकर, सचिव बी.वाय.होळकर,रमेश पालवे, प.स.सदस्य संजय शेवाळे, शिवा सुरासे, विशेष कार्यकारी अभियंता घुले, पणन विभागाचे अधिकारी आहेर यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Nashik News Lasalgaon Onion Market Sadabhau Khot