विवाहितेच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नाशिक : सातपूरमधील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या विवाहितेच्या पतीला व्यवसायासाठी दिलेले 10 लाख रुपये न देता, उलट संचालकालाच पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत सतत त्याचा छळ केला. त्यामुळे संबंधित संचालकाचे गेल्या आठवड्यात फायनान्स कार्यालयातच गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी संशयित विवाहितेविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  स्वप्निल अनिल पुंड (26, रा. सावता निवास, जिजामाता शाळेजवळ, सातपूर कॉलनी) या युवकाने गेल्या 18 तारखेला गळफास लावून आत्महत्त्या केली होती. स्वप्निल पुंड यांचे सातपूच्या कामगारनगरमधील सुयोग कॉलनीत श्रीराम फायनान्सचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयात संशयित मयुरी संदीप घावटे (रा. तारवालानगर) ही विवाहिता कामाला होती. तिच्या पतीला व्यवसाय करण्यासाठी संचालक स्वप्निल पुंड यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करीत 10 लाख रुपये दिले होते.

   गेल्या महिन्यांपासून स्वप्निल सदरच्या विवाहितेकडे स्वत: दिलेले 10 लाख रुपये परत मागत होते. प्रारंभी संशयित विवाहितेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. नंतर तर तिने थेट पोलिसात तुझ्याविरोधात तक्रार करण्याची धमकीच दिली. विवाहितेच्या या धमकीतून होणाऱ्या जाचाला कंटाळून आणि 10 लाख रुपयांची रक्कमही गमाविल्याच्या प्रकारातून शेवटी स्वप्निल यांनी फायनान्सच्या कार्यालयातच गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी स्वप्निल यांचा भाऊ सागर पुंड यांनी सातपूर पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार, संशयित विवाहिता मयुरी घावटे हिच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS MARRIED WOMEN SUCIDE