नाशिकमध्ये उद्या सोळाव्या महापौर,उपमहापौरांची निवड

residentional photo
residentional photo

नाशिक- महापालिकेच्या सोळाव्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक शुक्रवारी (ता. 22) सकाळी अकरा वाजता होणार असून नगरसेवक पळवापळवीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे.

पालिका मुख्यालयातील कर्मचायांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. 
राजीव गांधी मुख्यालयातील महासभा सभागृहात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रीया पार पडेल. सुरक्षेच्या कारणास्तव महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी दहा वाजेच्या आत कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातूनचं कर्मचायांना शुक्रवारी प्रवेश राहणार आहे. सकाळी साडे दहा वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यानंतर पूर्वेकडील प्रवेशद्वारातून निवडणूक सभेसाठी नगरसेवकांना ओळखपत्र तपासूनचं प्रवेश दिला जाणार आहे. नगरसचिव राजु कुटे यांच्यासह 10 कर्मचाऱ्यांचे पथक निवडणुक कामासाठी राहील. महापौर निवडणूकीच्या निमित्ताने वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप-सेना इतके दिवस युती म्हणून कार्यरत होते, मात्र आता दोघेही वेगळे झाले असून शिवसेना आघाडीत सामील होत असल्याने त्यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे नेमके कोण बाजी मारते आणि कशापद्दतीने हे पद आपल्याकडे खेचण्यासाठी डावपेच आखतात यावर बरेच काही अवंलबून आहे.
---------- 
असे निवडले जातील महापौर 
सकाळी अकरा वाजता महापौर व उपमहापौर निवडीला प्रारंभ होईल. प्रथम महापौर अर्जांची छाननी होईल. वैध उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे जाहीर केली जातील. माघारीसाठी पंधरा मिनिटांची मुदत दिली जाईल. माघारीच्या मुदतीनंतर एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्यास निवडणूक घेतली जाईल. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून वर्णानुक्रमे उमेदवारांची नावे घोषित केली जाईल. त्यानंतर हात वर करून मतदान घेतले जाईल. हात वर केलेल्या नगरसेवकांची नोंद घेतली जाईल. एकदा हात वर केल्यानंतर नगरसेवकाला पुन्हा मत बदलण्याचा अधिकार राहणार नाही. या निवडणुकीत जे नगरसेवक तटस्थ राहतील. त्याचीही स्वतंत्रपणे नोंद घेतली जाईल. समसमान मते पडल्यास चिठ्ठी पध्दतीने महापौर-उपमहापौरांची निवडला जाईल. उपस्थित सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्य ज्याची निवड करतील त्याच्या हस्ते चिठ्ठी काढली जाईल. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com