दोन जिल्ह्यांच्या सीमा..56 खेडी, पोलिस संख्या 23 

दीपक कच्छवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

येथील पोलीस ठाण्यात सध्या लाँकडाऊन बंदोबस्तासिठी पाच कर्मचारी बाहेरून आले आहेत. याठिकाणी लवकरच अतिरिक्त पोलीस कर्मचारी मिळणार आहेत तसा वरीष्टांकडे पाठपुरावा केला आहे.

सचिंन बेंद्रे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : येथील पोलीस ठाण्याअंतर्गत 56 खेडी आणि पोलीसांची संख्या  23. त्यातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेलेल्या दोन जिल्ह्यांच्या सीमा. त्यात दाराशी आलेला कोरोनाचा सामना कसा करायचा? ही स्थिती आहे मेहूणबारे पोलीस ठाण्याची निर्माण झाली आहे. एकीकडे  महसूल, आरोग्य विभाग कोरोनाशी जंग लढत असतांना दुसरीकडे अपुऱ्या पोलीस बळामुळे पोलीसांचे बळही अपुरे पडत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा सामना कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
मेहूणबारे (ता.चाळीसगाव) पोलीस ठाण्याची स्थापना 1951 साली झाली. तेव्हा 17 पदे मंजुर होती. या ठाण्याअंतर्गत सुमारे 56 खेडी येतात. त्यातही काही गावे कायमची संवेदनशील.काही गावे 15 ते 20 हजार लोकसंख्या आहे. 56 खेड्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणे तसे जिकरीचे काम मात्र कोणतीही कुरकुर न करता पोलीस बांधव सदनिग्रहणाय, खलनिग्रहणायची भूमिका पार पाडत आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. मात्र पोलीस ठाण्यातील मंजुर पदे 17 वरून केवळ 23 वर गेली. सध्यस्थितीत 23 पदे मंजुर असली तरी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व 21 पोलीस कर्मचारी असे  23 पोलीस कर्मचारी  कार्यरत आहेत. त्यातही दोन जण वैद्यकीय रजेवर आहेत. तर दोन वाहक व दोन महिला पोलीस कर्मचारी आहेत. म्हणजे 56 गावांसाठी केवळ 17 पोलीस कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.कायदा व सुव्यवस्था सांभाळतांना पोलीसांची अक्षरशा दमछाक होते. काही अनुचित प्रकार घडला तर बाहेरून पोलीस बंदोबस्त मागवावा लागतो. त्यातच दररोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटना व  त्यांचा तपास यातच पोलीस यंत्रणा गुरुफटून जाते. 

कोरानाचे उडवली झोप
कोरोना विषाणुचा गत महिन्यात भारतात प्रादुर्भाव झाला. हा कोरेना लवकर निघुन जाईल असे वाटले होते मात्र दिवसेंदिवस तो अधिकच आक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे.चाळीसगाव तालुका जळगाव, धुळे, औरंगाबाद व नाशिक या चार जिल्ह्याच्या सीमेवर शेवटचा तालुका आहे.शिवाय दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग या तालुक्यातून गेला आहे. धुळे, मालेगावसारखी संवेदनशील शहरे चाळीसगाव पासून अवघ्या 55 किमी अंतरावर आहेत. चाळीसगाव तालुक्याच्या सभोवती जिल्ह्यांमध्ये कोरोना थैमान घालत असला तरी  चाळीसगाव तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्याने ही बाब समाधानाची असली तरी धुळे, मालेगाव येथे ज्या वेगाने कोरोनाचे रूग्ण वाढत आहे ते पाहता कोरोनाचा उद्रेक तालु्नयात झाला तर हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.

पोलीसांची अक्षरशा दमछाक 
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची सीमा सील करण्यात आली आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतच जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन सिमा आहेत. एक मालेगाव व दुसरी धुळे रस्त्यावर. या दोन्ही सीमांवर  रात्रंदिवस पहारा करतांना मेहूणबारे पोलीसांची अक्षरशा दमछाक होत आहे.56 खेड्यंची लोकसंख्या पाहता कायदा व सुव्यवस्था सांभाळतांना मेहूणबारे पोलीसांना अक्षरशा कसरत करावी लागत आहे. कारोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून या जिल्ह्यातून त्या जिल्हयातील प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यातच खेड्यांवर जावून नागरीकांनी बाहेर पडू नये म्हणून पोलीसांना अक्षरशा विनवण्या कराव्या लागतात. कोरोनाविरोधात लढाई लढण्यासाठी केवळ पोलीसांचेच काम नाही तर जनतेनही गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर न पडणे गरजेचे आहे.मात्र नागरीक पोलीसांना न जुमानता घराबाहेर पडतात. अशावेळी पोलीसांना कठोर भूमिका घ्यावी लागते. मनात नसतांना देखील कारवाई करणे भाग पडते.
     
 मंजुर पदांचा प्रश्न प्रलंबीत
अपुरे पोलीस बळ असतांना देखील मेहूणबारे पोलीस जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाची लढाई लढत आहेत.56 खेडी आणि अवघे 23 पोलीस यावर मेहूणबारे पोलीस ठाण्याची मदार आहे. वर्षेनुवर्षे मंजुर पदांचा प्रश्न प्रलंबीत आहेत, लोकप्रतिनिधी येतात आणि जातात पण मेहूणबारे पोलीस ठाण्याचा मंजुर पदांचा अनुशेष काही भरून निघत नाही. कोरोनाने नागरीकांचे जीवन लॉकडाऊन केलेच पण अपुऱ्या बळामुळे प्रचंड खस्ता खात  मेहूणबारे पोलीसही एकप्रकारे लॉकडाऊनच झाले आहेत. 23 पोलीस या गावातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्या बरोबरच कोरोनाचाही मुकाबला करीतआहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare police station load two district border