live
live

मेथीची जुडी, फुकटही कोणी घेईना.... शेतात सोडली जनावरे

येवला : मेथीच्या भाजीची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने 50 पैसेसुद्धा भाव जुडीला मिळेनासा झाला आहे. किंबहुना फुकटसुद्धा भाजी घ्यायला कोणी तयार नसल्याने केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

भाजी परवडणारे नसल्याने गुरे सोडली

तातील भाजी काढून विक्रीला नेणे परवडणारे नसल्याने बल्हेगाव येथील तरुण शेतकरी राकेश जमधडे यांनी संतप्त होत शेतातच जनावरे चरण्यास सोडून दिली आहेत. तसेच रोज मेथी उपटून जनावरांना चारा म्हणून खाऊ घालत आहेत. 
शेतकऱ्यांचा मेथी बियाण्यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र आता एक रुपयाही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे मेथीच्या भाजीत जनावरे चरण्यासाठी सोडण्याची वेळ आली आहे.

फेकून देण्याची आली वेळ

अनेकदा भाजी विक्रीला नेली, की ग्राहकांअभावी ती पडून राहत असल्याने फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे नसल्याने शेतकऱ्यांनी मेथीला पसंती दिली. मात्र मेथीला बाजारभाव नसल्याने या शेतकऱ्याला रोज मेथी उपटून जनावरांना खाऊ घालण्याची व मेथीच्या भाजीत जनावरे चरण्यास सोडण्याची वेळ आली आहे. बियाण्यांसाठी केलला खर्च वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एकतर रब्बीची पिकेही धोक्‍यात आली असून, सध्या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळे होऊन मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यात हे संकट वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

पीक महिना-दीड महिन्यात येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे नसल्याने मेथीला पसंती दिली. दोन रुपये मिळतील, असे वाटत असताना आज मेथीचे भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काढणीच्या खर्चापेक्षा आम्ही जनावरेच शेतात सोडली. 
- राकेश जमधडे, शेतकरी, बल्हेगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com