बंदोबस्तात 22 दूधाचे टॅकर मुंबईला,शेतकऱ्यांचा विरोधाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नाशिक : जिल्ह्यातील दुधाची वाहतूक सुरळीतपणे सुरू असून सायंकाळी उशीरापर्यत 22 टॅंकर मुंबईकडे पोलिस संरक्षणात पाठविले गेले. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होउन त्यात, दूध पाठवू इच्छिणाऱ्यांना पोलिस संरक्षण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घोटी टोल नाक्यासह निफाड,दिंडोरी,इगतपुरी भागात काही ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या दूधाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाने दूध संघाच्या प्रतिनिधींच्या बैठक घेत, न घाबरता दूध पाठविण्याचे आवाहान केले. पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर आदीसह दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले, दुधाच्या टॅंकरची वाहतूक करताना जिल्हा प्रशासन अथवा पोलिस यंत्रणेशी समन्वय साधावा. दुध वाहतूकीचे वेळापत्रक प्रशासनाकडे दिल्यास वाहनांना तात्काळ पोलिस संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल. संघांनी दुध संकलना सुरू ठेवावे. संकलनात समस्या आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. 
जिल्ह्यातील दुध संकलन, वाहतूक, विविध दूधसंघाकडून होणाऱ्या दुधाची दैनंदिन वाहतूकीचा आढावा घेतला. सकाळी दुपारपर्यत 18 आणि सायंकाळी आणखी 4 याप्रमाणे उशीरापर्यत 22 टॅकर मुंबईला रवाना झाले होते. 

दूधाची स्थिती 
दूध संघ प्रमुख संघ दूध संकलन (लिटरमध्ये) स्थानीक वितरण गेलेले टॅंकर 
13 04 1 लाख 38 हजार 40 हजार लिटर 22 टॅकर 

100 आंदोलकांना कारवाईच्या नोटीसा 
सिन्नर-घोटी मार्गावर विशेष बंदोबस्त 
बंदोबस्ताच 22 टॅकर मुंबईला रवाना 
दूध वाहातूकीसाठी बंदोबस्ताची हमी 

कोट 
दूधसंघांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून इतरत्र होणारी दुधाची वाहतूक सुरू ठेवावी, वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाईल. दुधवाहतुकीसाठी प्रशासनाने मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 0253-2315080/2317151 किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी 0253-2303044 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
-राधाकृष्णन बी. (जिल्हाधिकारी नाशिक) 
 
Web Title: marathi news milk agation

फोटो गॅलरी