बंदोबस्तात 5 लाख 71 हजार लिटर दूध रवाना,आजच्या बैठकीत पुढील दिशा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नाशिक : दूधाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातून बंदोबस्तात 65 दूधाच्या टॅकरमधून 5 लाख 71 हजार 700 लिटर रवाना झाले. राज्यभरात दूध आंदोलन पेटले असतांना नाशिक विभागात दूध वितरण सुरळित सुरु ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, हुकूमशाही पध्दतीने दूध आंदोलकांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी आजामीनपात्र गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ उद्या (ता.20) नाशिकला सर्वपक्षीय बैठक होत आहे. 

नाशिक (22), नगर (28), जळगाव (15) याप्रमाणे एकंदर 65 टॅकरमधून 5 लाख 71 हजार 700 लिटर दूध विविध भागात पाठविण्यात आले. त्यात, मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, सूरत, नाशिक,चांदवड, शहापूर यासह विविध भागात दूधाचे टॅकर पाठविले गेले. काल(ता.18) च्या तुलनेत आज टॅकरची संख्या कमी आहे. दूध संकलनावर चाळीस टक्केच्या आसपास परिणाम झाला आहे. मात्र दूधाचे वितरण मात्र पोलिस बंदोबस्तात नियमितपणे सुरु आहे. 

आजच्या बैठकीतून पुढील दिशा 
या दूध दरवाढ मागणीच्या आंदोलनाच्या आंदोलकांकडे सरकार हुकूमशाहीपध्दतीने पहात आहे. आंदोलन मोडीत काढण्यासाठी बळाचा वापर करून त्रास देणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यावर शहापूर येथे आजीनमात्र पात्र गुन्ह्याची कलमे दाखल केली. त्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी (ता.20) अकराला पंडीत कॉलनीतील गोदावरी बॅकेत सर्व पक्षीय कार्यकर्त्याची बैठक होत आहे. अशी माहीती समाधान भारतीय यांनी दिली 
 
विभागातील दूध पुरवठा 
जिल्हा दूध संघ टॅकर (लिटरमध्ये) 
नाशिक 11 22 1 लाख 80 हजार 
नगर 05 28 2 लाख 61 हजार 
जळगाव 07 15 1 लाख 30 हजार 400 

Web Title: MARATHI NEWS MILK AGATION