जिल्ह्यात मनसेची 15 जागा लढविण्याची तयारी 

residentional photo
residentional photo

नाशिक- ईव्हीएम यंत्रावर अविश्‍वास दाखवतं निवडणुकीपासून चार हात लांब राहण्याची भुमिका घेणाया मनसेकडून नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली. शहरी भागात मनसेकडे उमेदवार असले तरी ग्रामिण भागात मात्र दयनिय अवस्था असतानाही मनसेच्या नेत्यांकडून झालेली घोषणा आघाडीसह भाजप-शिवसेनेत खळबळ उडवून देण्यासाठी पिल्लु सोडल्याचे मानले जात आहे.

दरम्यान प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे व अभिजित पानसे यांनी राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम असल्याची आठवण करून देतांना या प्रेमाची परतफेड करण्याचे भावनिक आवाहन केले. 

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली होती. त्यावेळेस सभेला झालेल्या गर्दीमुळे भाजप व शिवसेनेच्या पोटात भितीचा गोळा उठला होता. राज यांच्या सभेला मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादामुळे राज्यात मोठा चमत्कार घडण्याची शक्‍यता होती,ईव्हीएम यंत्रातून वेगळीचं परिस्थिती बाहेर आल्याने उदिग्न झालेल्या राज यांनी थेट विधानसभा निवडणुकीतूनचं माघार घेण्याचा निर्णय घेतला. पण निवडणुक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यानंतर मनसेत राजकीय हालचाली गतिमान झाल्या. त्याअनुषंगाने इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी मनसेचे नेते आज पक्षाच्या राजगड कार्यालयात दाखल झाले. सकाळी अकराला प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे व अभिजित पानसे यांनी बैठक घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, सलिम शेख, अंनता सुर्यवंशी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना सर्वचं पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी केली. 

निवडणुकीच्या तयारीला लागा 
कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर श्री. देशपांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन ते चार उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघ निहाय अहवाल पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. 

मनसेकडून सोडलेले पिल्लु? 
जिल्ह्यातील सर्व जांगावर मनसेकडे सक्षम उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी शहरी भागातील चार मतदारसंघ वगळता ग्रामिण भागात पक्षाची दयनिय अवस्था आहे. त्यामुळे सर्व जागा लढविण्याचे मनसेकडून पिल्लू सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप व शिवसेनेची युती होणार असल्याने दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी निर्माण होवून ते उमेदवार मनसेकडे खेचून घेण्याचा प्रयत्न आहे त्या जोरावरचं मनसेकडून सर्व जागा लढविण्याची घोषणा झाल्याचे बोलले जात आहे. 

ढिकलेंचे विक्रम लॅण्डर संपर्कात 
पुर्व विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले गेल्या दोन अडीच वर्षांपासून तयारी करतं आहे. पण राज ठाकरे यांनी निवडणुक न लढविण्याचा मध्यंतरी घोषणा केल्याने ढिकले दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. आज पक्षाचे नेते इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आले असताना ऍड. ढिकले अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधान आले होते. पण यासंदर्भात ढिकले यांनी "सकाळ' शी बोलताना मनसे नेत्यांशी चर्चा केल्यानंतरचं कामानिमित्त मुंबईत आल्याचे सांगितले तर ढिकले मुंबईत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असुन त्यांचे विक्रम लॅण्डर आमच्या संपर्कात असल्याचा विनोद श्री. देशपांडे यांनी केला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com