मायलेक खून प्रकरणात फाशी की जन्मठेप; आज फैसला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी रामदास शिंदे याने स्वत:च्या तीन मुलांचा विचार करून कठोर शिक्षेऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे दयेची मागणी केली. तर अखेरच्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाने विवाहितेसह तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा खून करणारा आरोपी समाजात राहण्यास लायक नसल्याचे सांगत, फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली. याबाबत न्या. शिंदे यांनी आज शिक्षेचा फैसला राखून ठेवत गुरुवारी (ता.26) सुनावणार आहेत. 

   आरोपी रामदास शिंदे याने भाडेकरी राहत असलेले कचरू संसारे यांची पत्नी पल्लवी व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा विशाल यांचा 18 एप्रिल 2016 च्या मध्यरात्री निर्घृणपणे खून केला होता. याप्रकरणी आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. सूर्यकांत शिंदे यांनी बचाव पक्ष व सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली. तत्पूर्वी आरोपी रामदास शिंदे याच्याकडे न्यायालयाने "काय सांगायचे का' अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने गुन्हा नाकबुल करीत, आपल्याला तीन लहान-लहान मुले असून दया दाखवावी अशी विनंती केली. त्यानंतर बचाव पक्षाने, सदरच्या घटनेमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे नाहीत. त्यामुळे कठोर स्वरुपाची शिक्षा देणे चुकीचे ठरेल असा युक्तिवाद केला.

   सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी, स्वत:च्या लहान मुलांचा संदर्भ देणाऱ्या आरोपी शिंदे याने अवघ्या 6 वर्षांचा मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. विवाहितेने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिच्यावर चाकून तब्बल 24 वार करीत खून केला. याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. समाजाला काळीमा फासणारी हा गुन्हा असून जर आरोपीला कठोर शिक्षा न झाल्यास, समाजातील महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल. त्यामुळे अशा आरोपीला समाजात जगण्याचा अजिबात अधिकार नसल्याचा युक्तिवाद करत त्यास फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: marathi news mother and boy murder