मातृ दिन : चार वर्षाचा हृदयाचा तुकडा दूर ठेवत नगरवासियांचा बनली आधार 

mothers day
mothers day

पारोळा : कोरोना व्हायरसने महामारीचे संकट आणले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी माया, ममता दूर ठेवून अनेकजण सेवेत लढत आहेत. अशाच आपल्या चार वर्षाचा काळजाचा तुकडा असलेला जय यास माहेरी (पारोळा) येथे आई- वडीलांकडे सोडून सासरी अहमदनगर येथे डॉ. मृणाल पाटील कोरोनाचा संकट काळात सेवेचा आधार देत आहे. ममत्वाला बाजुला सारुन कोरोनाचा मुकाबला करणारी आईची ही हृदयस्पर्शी कहाणी मनाला चटका लावणारी आहे. तर आई- वडीलांचे कौटुंबिक वात्सल्य बाजुला सारुन मुलगा डॉ. गोविंद पाटील व सासरची कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन आदर्श सुन डॉ. पुर्वा पाटील यांची कहाणी मन हेलावणारी आहे. 

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणुन शासन खबरदारी म्हणून अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेत आहे. कोरोनाचा मुकाबला करणेसाठी रियल हिरो म्हणुन पोलिस, सफाई कर्मचारी व डॉक्‍टर यांची भुमिका निर्णायक ठरत आहे. अशा भयावह परिस्थितीत डॉ. मृणाल पाटील ममतेला बाजुला सारुन रुग्णसेवेला प्राधान्य देत आपल्या चार वर्षीय मुलाला ममत्व देण्यापेक्षा देशावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची भुमिका घेतल्याने डॉ. पाटील यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. कोरोना महामारीचा काळात ममतेचे बलीदान देत सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी आरोग्यदुत म्हणुन सेवा निभावणेचे व्रत डॉ. मृणाल पाटील यांनी घेतल्याने आज मातृदिनी खरोखर सेवायागाला आधार दिला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

पारोळ्यात जय तर नगरमध्ये आई 
लोणी (ता.पारोळा) गृप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व बोरी कॉलनी येथील रहीवाशी डॉ. भागवतराव पाटील यांच्याकडे चार वर्षीय जय राहत आहे. आईच्या ममतेची उणीव भासत असतांना देखील जयची आजी साधना पाटील हे ममतेच्या वात्सल्याने जयचा सांभाळ करित आहे. एकीकडे मुलगी ही कोरोना संसर्गाचा मुकाबला करणेसाठी जिवाची पर्वा न करता रात्र- दिवस झुंज देत आहे. तर दुसरीकडे जयला आईच्या वात्सल्याची उणीव भासू न देता यातुन मार्गक्रमण करित आजी आजोबा लहानग्या जयची देखभाल करित आहे. तरी देखील मातृत्वाची ओढ असल्याने रात्री घरी आल्याने रोज माहेरी फोन करून मुलाची विचारपूस करतात. पण कधी झोपी गेलेल्या जयचा निरागस चेहरा व्हिडीओ कॉलींगद्वारे पाहून डॉ. मृणाल यांचे मन भरून येते. 

तिनही भावंडे बनली कोरोना वॉरियर्स 
अहमदनगर येथे डॉ. मृणाल पाटील तर धुळे येथे डॉ. गोविंद पाटील व डॉ. पुर्वा पाटील यांचे देखील कोरोनाचा पार्श्वभुमीवरिल योगदान मनाला वेदना देणारे आहे. एकीकडे डॉ. पुर्वा ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे डॉ. गोविंद पाटील हे आई वडीलांच्या ममत्वाला विसरुन कोरोनाग्रस्तांची सेवा करित आहे. एकंदरित तिन्ही भावंडे यांचा कोरोनाचा संकट काळात सेवेचा आधार कौतुकास्पद आहे. आधी फत्ते कोरोनाशी मग ममतेच्या वात्सल्याची म्हणण्याची वेळ यांच्या हा हदसस्पशी कहाणीत व्यक्त होतांना दिसते. 

आपल्या हातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली जावी. हा वडीलांचा आदर्शवत डोळ्यासमोर ठेवुन तीनही मुलांना वैद्यकिय क्षेत्रात पारंगत केले. आज देशावर आलेल्या संकटात मुलांचे योगदान कौतुकास पात्र आहे. ममतेला अंतर देत कोरोनाशी लढा देण्यास प्राधान्य देणारी माझी मुले खरोखर लौकीकास पात्र आहेत. 
डॉ. भागवतराव पाटील, पारोळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com