उंदराचे चावे सहन करीत चाकरमण्यांचा रेल्वेप्रवास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक : मंत्रालयातील उंदराचे प्रकरण गाजत असतांनाच मध्य रेल्वेच्या गाड्यातील प्रवाशीही उंदराच्या चाव्याने अनेक प्रवाशी त्रस्त आहेत. मंत्रालयातील उंदराच्या निमित्ताने पंचवटीसह विविध रेल्वेगाड्यातील त्रस्त रेल्वे प्रवाशांची नाराजी पुढे आली आहे. 

नाशिक : मंत्रालयातील उंदराचे प्रकरण गाजत असतांनाच मध्य रेल्वेच्या गाड्यातील प्रवाशीही उंदराच्या चाव्याने अनेक प्रवाशी त्रस्त आहेत. मंत्रालयातील उंदराच्या निमित्ताने पंचवटीसह विविध रेल्वेगाड्यातील त्रस्त रेल्वे प्रवाशांची नाराजी पुढे आली आहे. 

मध्य रेल्वेच्या मार्गावरील पंचवटी, गोदावरीसह विविध एक्‍सप्रेसमध्ये उंदराचा उच्छाद ही प्रवाशांची डोकेदुखी आहे. रेल्वे डब्यातून उंदीर हिंडतात पण आता ते झोपलेल्या प्रवाशांना चावे घेउन त्रस्त करतात. रेल्वे स्थानकासह रेल्वे डब्यातही मुबलक प्रमाणात उंदराचा शिरकाव आहे. नित्यनेमाने त्यांचा त्रास सहन करीतच मनमाड -मुंबई दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या चाकरमण्यांना त्याचा त्रास सोसावा लागतो. अशाच प्रकारात आज शुक्रवारी (ता.23) पंचवटी एक्‍सप्रेसच्या पाचव्या बोगीत उघडकीस आला. मनमाडयेथून रोज मुंबईला ये जा करणाऱ्या प्रवाशाच्या पायाला उंदारानी चावा घेतला. त्यामुळे मंत्रालयासोबत रेल्वेतील उंदराचा विषय चर्चेत राहिला. 

महिलेच्या दक्षता 
नाशिक जिल्ह्यातून रोज अनेक चाकरमणी मुंबईला प्रवास करतात. त्यापैकी मनमाड येथील रशीद शेख हे मुंबईला रोज पंचवटी एक्‍सप्रेसने प्रवास करतात. आज नेहमीप्रमाणे  ते बसल्यानंतर नाशिक रोड पासून काही अंतरावर आल्यानंतर बहुतांश प्रवाशी नाशिक ते कल्याण दादर पर्यत विश्रांती म्हणून झोपतात. त्यानुसार शेख झोपले असतांना त्यांचे पाय उंदरांनी कुरतडले. बोगातील निर्मला गोसावी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने उंदर हाकलून लावले. शेख यांना जागे करुन उठविले. त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. 

रेल्वे प्रवासी निर्मला गोसावी म्हणाल्या,रेल्वेत उंदराचा वावर असतोच पण झोपेतील प्रवाशांना चावा घेण्याचे प्रकार होतात. आज तसाच प्रकार दिसला. रोजच्या दहा तासाचा प्रवास आणि दैनंदिन ड्युटी यामुळे 
दमणाऱ्या प्रवाशांच्या बहुदा हे प्रकार लक्षात येत नसावेत.पण उंदरानी अवयव कुरतडने हे गंभीरच आहे.  

रेल्वे प्रवासी संघटनेचे देविदास पंडित म्हणाले, समस्या नेहमीची आहे.इतर गाड्यांचे माहीती नाही. पण पंचवटीतून आम्ही नेहमी प्रवास करतो. पंचवटीत उंदराचा उच्छाद हा नेहमीची समस्या झाली आहे. यावर अनेकदा प्रशासनाला सांगूनही उपयोग होत नसल्याची पंचवटीतील रेल्वे प्रवाशांची व्यथा आहे.

Web Title: marathi news mouse bite