नाशिकमध्ये आज राज्य पूर्व परिक्षा,दोन केंद्रात बदल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

नाशिक ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उद्या (ता.8) होणाऱ्या राज्य सेवा (पुर्व) परिक्षेच्या दोन परिक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. नाशिकला 28 केंद्रावर परिक्षा होणार आहे. त्यासाठी नाशिकमधून 10 हजार 848 परिक्षार्थीनी अर्ज भरले आहेत. 

लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेसाठी नाशिकमध्ये 28 केंद्रावर परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परिक्षेच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने 735 कर्मचारी नियुक्त केले आहेत. नाशिकमधील 28 केंद्रापैकी के.के.वाघ आभियांत्रिकी आणि एसएमआरके महाविद्यालय अशा दोन उपकेंद्रात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे.

उपकेंद्र क्रमांक 2 के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ऍ×ण्ड रिसर्च सेंटर, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम,पंचवटी नाशिक येथील बैठक क्रमांक NS002001 ते NS 002480 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्‍निक, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम,पंचवटी नाशिक या इमारतीत करण्यात आली आहे. 

एमएमआरकेमध्ये दुसरे केंद्र 
दुसरे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयातील उपकेंद्र क्रमांक 16 या केंद्रातील आसन क्रमांक NS016001 ते NS016360 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था त्याच कॅम्पसमधील कृषी नगर, जॉगींग ट्रॅक शेजारील सर डॉ.मो.स.गोसावी महाविद्यालयात केली आहे. ऐनवेळच्या या केंद्रातील 
बदलाबाबतची माहीती देण्यासाठी संबधित महाविद्यालयाच्या आवारात ठळक फलक लावले जाणार आहे.

दोन कर्मचारी माहीती देण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी ऐनवेळच्या बदलानुसार त्यांच्या प्रोफाईलमध्ये सुधारित प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या मोबाईल दुरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे केंद्र बदलाची माहीती दिली आहे. 

संर्पकासाठी क्रमांक 
ऐनवेळी बदललेल्या या केंद्राविषयी माहीतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या ऐनवेळच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यानी संजय फिरके यांच्याशी (9890031811) क्रमांकावर संर्पक साधण्याचे आवाहान करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news mpsc pre exam