अंतुर्ली परिसरात केबल चोरीचे सत्र सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

मुक्‍ताईनगर ः अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) परिसरात शेत शिवारातील केबल चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शेतकरी अगोदरच दुष्काळी परिस्तिथीत असून त्यामध्ये उन्हाळ्यामुळे ट्यूबवेल आणि विहिरीची पाण्याची खालावलेली पातळी याकरिता केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची चाललेली कसरत या सर्व गोष्टीमुळे शेतकरी चिंतातुर झालेला आहे. यात केबल चोरी होण्याचे प्रकार परिसरात सुरू झाले आहेत. 

अंतुर्ली परिसरात 10 मे रोजी मध्यरात्री नरवेल शिवारातील शेतकरी मोहन सुधाकर महाजन, निळकंठ सीताराम महाजन, राजेंद्र सिताराम महाजन, राजेंद्र सिताराम महाजन, प्रदीप नामदेव महाजन, अशोक सेनू पाटील, कैलास घाटे, रामदास घाटे, दत्तात्रय कापसे, रवींद्र बाळ, प्रकाश धनगर, शरद महाजन, विनोद विश्वनाथ महाजन यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांच्या केबल वायरी किंमत सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपयांच्या केबल वायरी लंपास केल्या आहे .पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी आणि केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकाऱ्यांकडून मागणी होत आहे. 

Web Title: marathi news muktainagar cabel chori