कोरोना बाधीताच्या संपर्कातील चौदा जणांचे निगेटीव्ह अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

तपासणी अहवाल प्राप्त झाला असून सर्व 14 जणांना कोरोना नसल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहीती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी दिली. 

मुक्ताईनगर : मलकापूर तालुक्‍यातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील मन्यारखेडा येथील 14 जणांना पुढील चाचणीसाठी जळगावला रवाना करण्यात आले होते. तिथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या सर्वांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून सर्व 14 जणांना कोरोना नसल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहीती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी दिली. 

हेपण वाचा - जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण; दोघांचाही मृत्यू 

कोरोना बाधीत महिला तालुक्‍यातील मन्यारखेडा येथे 13 दिवस आधी मुक्कामी राहिल्याची माहिती समोर आल्याने तालुक्‍यात एकच खळबळ माजली होती. रुईखेडा पोलीस पाटील सविता बढे व मन्यारखेडा पोलीस पाटील अर्चना पाटील यांनी गावातील वाढता गोंधळ पाहता प्रशासनाला माहिती दिल्याने लगेच तहसीलदार शाम वाडकर व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या सूचनेनुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील व कर्मचारी यांनी सदर गावात लागलीच निर्जंतुकीकरण फवारणी केली व महिलेच्या संपर्कातील 14 जणांना पुढील चाचणीसाठी जळगावला रवाना केले होते. 

अन्‌ धाकधुक संपली 
महिलेच्या संपर्कातील चौदा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल आज जिल्हा सामान्य रुग्णालय व मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. ही तालुक्‍याच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे; अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar corona saspected 14 people negative