क्‍लिनचिट मिळाल्यानंतर समर्थकांकडून माजी मंत्री खडसेंची आंबेतुला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

 

जळगाव ः माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी प्रकरणात "एसीबी'ने क्‍लिन चीट दिले आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरु झालेली तथ्यहीन आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे आंबे तुला केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. 

 

जळगाव ः माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी प्रकरणात "एसीबी'ने क्‍लिन चीट दिले आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरु झालेली तथ्यहीन आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे आंबे तुला केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. 

अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. भोसरी प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना एसीबीने क्‍लीन चीट दिली. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 13 मे रोजी या तथ्यहिन आरोपांना सुरवात झाली होती. या आरोपांची मालिका संपल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खडसे यांच्या समर्थकांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. शिवाय खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांचादेखील आज वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून खडसे यांची आंबे तुला करण्यात आली आहे. भाजपचे मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांच्यासह खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे फार्महाउसवर आंबे तुला सोहळा पार पडला. यावेळी खडसे परिवार उपस्थित होता. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संदीप देशमुख यांनी यावेळी "नाथाभाऊ आमचा राजा आहे आणि आंबा फळांचा राजा' त्यामुळे खडसे यांच्यावरील तथ्यहीन आरोप दूर झाल्याचा आनंद या माध्यमातून व्यक्त करत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्‍त केली. 

आरोपांमधून नक्‍कीच बाहेर येणार ः खडसे 
आपल्या विरोधात 13 मे 2016 ला तथ्यहिन आरोपांची मालिका काही समाजसेविकांनी सुरु केली होती. दोन वर्ष ही मालिका सुरु होती. दाउदच्या बायकोशी दूरध्वनी वरून संभाषण, जावयाची लिमोझिन कार, पीए ने लाच घेतली अपसंपदा जमवली. यासारखे आरोप केले गेले, पण त्यात काही तथ्य नव्हते. तरीही याची नैतिक जबाबदारी स्विकारून आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनात चीड, संताप होता; तो आजही आहे. मात्र एसीबीने या संदर्भात अहवाल न्यायालयात सादर केला असून, त्यात क्‍लीनचीट देण्यात आले आहे. या आरोपांची मालिका संपली आणि त्याचबरोबर स्नुषा खासदार रक्षा खडसे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी आंबा तुला केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. आपले आंब्याचे याठिकाणी झाड असून मतदार संघातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित असल्याने त्यांचे प्रेम पाहून आपण भाराऊन गेलो आहोत. या आरोपांमधून आपण नक्कीच बाहेर येऊ असा विश्‍वास वाटत असल्याची प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री खडसे यांनी आंबेतुला सोहळ्यानंतर व्यक्त केली आहे

Web Title: marathi news muktainagar khadse aambetula