मुंबई-नागपूरसाठी विशेष गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भुसावळ, :: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते नागपूरदरम्यान नऊ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना वाढत्या गर्दीचा सामना न करता, सोईस्कररीत्या प्रवास करता येणार आहे. 

भुसावळ, :: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते नागपूरदरम्यान नऊ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना वाढत्या गर्दीचा सामना न करता, सोईस्कररीत्या प्रवास करता येणार आहे. 

नागपूर ते मुंबई दरम्यान अप मार्गावर तीन गाड्या चालविण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक ०१२६२ बुधवारी (ता. ४) नागपूर स्थानकावरून रात्री ११.५५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी दुपारी २.३५ वाजता मुंबईत पोहोचणार आहे. तसेच ५ डिसेंबरला गाडी क्रमांक ०१२६४ ही सकाळी ७.५० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १२.१० वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर गाडी ०१२६६ क्रमांक नागपूर - मुंबई एक्स्प्रेस दुपारी ३.५५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता मुंबईत पोहोचेल. या गाड्या मार्गात अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. 
गाडी क्रमांक ०१२४९ डाऊन मुंबई - अजनी एक्स्प्रेस ही गाडी ६ डिसेंबरला मुंबई येथून दुपारी ४.०५ वाजा सुटून अजनी येथे सकाळी साडे नऊला पोहोचेल. तसेच ०१२५१ डाऊन मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी ६ डिसेंबरला मुंबई येथून सायंकाळी ६.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहला सेवाग्रामला पोहोचेल. ०१२५३ डाऊन दादर-अजनी ही गाडी ७ डिसेंबरला रात्री १२.४० वाजता सुटून अजनी येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. 
गाडी क्रमांक ०१२५५ डाऊन मुंबई - नागपूर ही गाडी ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता मुंबई येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनला नागपूरला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०१२५७ मुंबई -नागपूर एक्स्प्रेस ८ डिसेंबरला सायंकाळी ६.४० वाजता मुंबईतून सुटणार आहे. ०१२५९ डाऊन दादर-अजनी एक्स्प्रेस ८ डिसेंबरला रात्री १२.४० वाजता सुटून अजनीला दुपारी चारला पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, कसारा, ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम व अजनी येथे थांबणार आहे. 

मुंबईसाठी सुपरफास्ट गाडी 
गाडी क्रमांक ०२०४० अप अजनी -मुंबई ही गाडी ७ डिसेंबरला अजनी येथून दुपारी तीनला सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईला सकाळी ५.१० वाजता पोहोचेल. या गाडीची फक्त एकच फेरी होणार आहे. ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, इगतपुरी, कल्याण, दादर येथे थांबणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai nagpur special rialway