छाननीची प्रक्रिया पूर्ण; 189 जणांचे अर्ज अवैध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेसाठी तब्बल दोन दिवस लागले. आज दुपारी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. अर्ज छाननीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना झालेल्या चुका, सह्या नसलेल्या, तसेच एकाच प्रभागात दोन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा एक 
अर्ज अवैध ठरविण्यात आला. एकूण दाखल झालेल्या 615 पैकी 426 अर्ज वैध; तर 189 अर्ज अवैध ठरविण्यात आले. 
महापालिकेच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे काल अर्ज छाननी प्रक्रियेस 

सुरवात झाली होती. तसेच आजही निवडणूक अधिकारी 1 व 2 यांच्याकडे काही प्रभागांमधील अर्जांची छाननी बाकी होती. निवडणुकीसाठी एकूण 19 प्रभागांतील 75 जागांसाठी 615 पैकी 189 अर्ज छाननीअंती अवैध ठरविण्यात आले. तसेच आलेल्या 11 हरकतींवरही निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन आलेल्या हरकती पडताळून पाहिल्या. 

शिवसेनेचे तीन उमेदवार आता अपक्ष 
शिवसेनेतर्फे प्रभाग क्र. 19 साठी उमेदवारी अर्ज भरणारे जिजाबाई भापसे, विक्रम (गणेश) सोनवणे यांनी अर्जासोबतच्या "एबी फॉर्म'मध्ये नमूद केलेले नाव व चुकीच्या राखीव जागेचा उल्लेख केल्याने हे "एबी फॉर्म' निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्दबातल केले. त्यामुळे जिजाबाई भापसे व गणेश सोनवणे यांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच प्रभाग क्र. 11 (क) मधून लीना पवार यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या "एबी फॉर्म'मध्ये चूक झाल्याने त्यांना अपक्ष ठरविण्यात आले. याबाबत श्रीमती पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हेमलता वाणी यांनी प्रभाग क्र. 7 "अ'साठी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला. त्यांच्याही "एबी फॉर्म'मध्ये चूक झाल्याने त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे. 

साधना श्रीश्रीमाळ दोन प्रभागांत उमेदवार 
शिवसेनेच्या साधना श्रीश्रीमाळ यांनी प्रभाग क्र. 7 "अ' तसेच तसेच प्रभाग क्र. 16 ब'मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या यंदाच्या अर्थात 2018 च्या निवडणुकीत त्या दोन प्रभागांतून निवडणूक लढविणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत. 

पक्षनिहाय उमेदवारांची संख्या 

पक्ष उमेदवारांची संख्या 
- भाजप.......................75 
- शिवसेना....................72 
- राष्ट्रवादी कॉंग्रेस.....................44 
- कॉंग्रेस......................17 
- अपक्ष.......................199 
- एमआयएम..................6 
- कम्युनिस्ट...................1 
- बहुजन समाज पक्ष........................1 
- समाजवादी पार्टी......................... 6 
- हिंदू महासभा.................3 
-बीआरएसपी..................2 
एकूण..........................426 

Web Title: marathi news muncipal corporation election