चूक महापालिकेची आणि भुर्दंड मात्र नागरिकांना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सिडको : सन 2017-2018 ची घरपट्टी बिलांचे वाटप महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी न केल्यामुळे आता या वर्षाच्या घरपट्टीसह मागील वर्षाच्या घरपट्टीची रक्कम येथील नागरिकांना भरावी लागत आह आणि त्यातही गेल्या वर्षीच्या घरपट्टीला दोन टक्के व्याज या दराने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सिडको : सन 2017-2018 ची घरपट्टी बिलांचे वाटप महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी न केल्यामुळे आता या वर्षाच्या घरपट्टीसह मागील वर्षाच्या घरपट्टीची रक्कम येथील नागरिकांना भरावी लागत आह आणि त्यातही गेल्या वर्षीच्या घरपट्टीला दोन टक्के व्याज या दराने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बहुतांश नागरिकांना सुमारे 40 ते 50 रुपये व्याजाचा दंड भरावा लागत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व अंबड परिसरात मध्यमवर्गीय कामगार मोठया संख्येने वास्तव्यास आहे.महापालिकेचे कर्मचारी वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी वाटप करीत नसल्याचे यापूर्वीही स्पष्ट झालेले आहे त्यात काही कर्मचारी तर पोट कर्मचारी लावून ही बिले वाटप करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

   बऱ्याचदा बिले मिळत नसल्यामुळे नागरिकांना महापालिकेत धाव घ्यावी लागते व नंतर इंडेक्‍स क्रमांक सांगून घरपट्टी भरावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी सिडको व अंबड परिसरातील नागरिकांना सन 2018- 2019 च्या घरपट्टीची बिले वाटप करण्यात आली त्यात अनेकांना मागील वर्षीची घरपट्टी थकित असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे एकाच वेळी मोठा भुर्दड तर नागरिकांना बसला आहे

  प्रत्यक्ष घरपट्टी भरण्यासाठी गेल्यानंतर मागील वर्षाच्या घरपट्टीला दर महिन्याला दोन टक्के व्याज ( शास्ती) लागली असल्यामुळे नागरिकांना सुमारे चाळीस ते पन्नास रुपयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
याबाबत संबधित कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्हाला काही माहित नाही तुम्ही म्‌ुख्य लिपिकाला भेटा असे उत्तर दिले जात आहे त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे जायचे असा प्रश्‍न पडला आहे.विशेष म्हणजे वाढीव व्याजदराचा पावतीत कुठेही उल्लेख येत नसल्यामुळे आणि नागरिकांना बिलेच वाटप न झाल्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. अंबड लिंक रोड, शिवाजी चौक, पांगरे मळा, महाजननगर, प्रसादनगर या व इतर भागातील नागरिकांना मागील वर्षीची घरपट्टीची बिलेच वाटप झालेली नाहीत त्याची चौकशी करावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान सौर उर्जेचा वापर असलेल्या निवासी मिळकतीला घरपट्टीत पाच टक्के सवलत आहे पण पहिल्यांदा पूर्ण बिल भरा नंतर विभागीय कार्यालयात माहिती जमा करा असा सल्ला घरपट्टी विभागातील कर्मचारी देत आहेत.

  सिडको विभागीय कार्यालयातील कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना काहीही माहिती कुणीही विचारली असता आम्हाला माहिती देण्याचे अधिकार नाहीत ,तुूम्ही राजीव गांधी भवनच्या मुख्य कार्यालयातील जनसंपर्क विभागात जा ? असा सल्ला दिला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. घरपट्टी बिलामध्ये आग निवारण कर, वृक्षसंवर्धन कर, स्वच्छता कर, लनिस्सारन लाभ कर,महापालिका शिक्षण कर,सरकारी शिक्षण कर, या व इतर करांची रक्कम आहे त्यातील किती सुविधा महापालिका देते याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
 

Web Title: marathi news muncipal tax