डोक्यात दगड घालून भंगार वेचणाऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नाशिकः नाशिक रोडला वास्को चौकाजवळ बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय 45) याच्या डोक्‍यात दगड घालून कुणीतरी खून केल्याचा प्रकार आज सकाळी 
उघडकीस आला. मध्यरात्री केव्हातरी तिघांनी दगड घालून खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

नाशिकः नाशिक रोडला वास्को चौकाजवळ बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय 45) याच्या डोक्‍यात दगड घालून कुणीतरी खून केल्याचा प्रकार आज सकाळी 
उघडकीस आला. मध्यरात्री केव्हातरी तिघांनी दगड घालून खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

मृत दोंदे देवळालीगावात रोकडोबावाडीत रहायला आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. तो मजुरीचे काम करायचा. मृताला दारुचे व्यसन होते. तो अनेकदा घर सोडून बाहेर रहायचा. दिड महिण्यापासून तो असाच घराबाहेरच रहायचा. मिळेल तेथे मजूरीचे काम करायचा. अनेकदा तो रात्रीतून भंगार वेचायचे काम करुन उदरनिर्वाह करायचा असे त्याच्या कुटुंबियानी म्हटले आहे.

रात्रीतून भंगार वेचण्याच्या दरम्यान त्यावर हल्ला होउन डोक्‍यात दगड घालून त्याचा खून झाला असावा असा संशय आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. 
पोलिसांनी सांगितले की, वास्को चौकातील भंडारी ब्रदर्स प्लायवुड सनमाईका दुकानासमोर आज सकाळी स्थानीकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे चौकात गर्दी झाली. 

रात्रीतून कधीतरी त्याच्या डोक्‍यात दगड घालून हा खून झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी मृताचा भाउ अनिल दोंदे (वय 52) चेहेडी शिव नाशिक रोड यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांचया तक्रारीनुसार, वास्को चौकात पहाटे चारच्या सुमारास या भागात भंगार वेचणाऱ्या संतोष चंदू कटारे (सिन्नरफाटा) याला रात्री मृताच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. त्याची मृत बाळू यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा जखमी बाळूनेच, तिकडे जाउ नकोस, तिघांनी मला मारले आहे. असे सांगितले. त्यामुळे रात्रीतून अज्ञात तिघांनी त्याचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

रात्रीतून कधीतरी हा खून झाल्याचे पुढे येते आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली 
नव्हती. 
 

Web Title: marathi news murder