नामकोच्या 21 जागांसाठी आज मतदान,तीन पॅनल रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नाशिक उत्तर महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या नाशिक मर्चंट्‌स को.ऑपरेटीव्ह बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या ( ता.23) मतदान होत आहे. सकाळी आठ ते दुपारी पाचपर्यंत 310 मतदान केंद्रांवर 21जागासाठी 82 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 1 लाख 76 हजार मतदार आपला हक्क बजावतील. 

दहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणुक होत आहे. हैद्राबाद,इंदूर, सुरत,अहमदाबाद येथे मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. निवडणुक अधिकारी मिलिंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार 200 कर्मचारी त्यासाठी तैनात केले आहेत. आज सकाळी कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. यंदा प्रथमच बॅंकेचे पासुबक अथवा ओळखपत्राद्वारेच मतदन करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रगती,सहकार व नम्रता असे तीन पॅनल रिंगणात आहे.
 
Web Title: marathi news namco